पुणे : रघुनाथ कुचिक (raghunath kuchik) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरूणीने एक नवा गौफ्यस्फोट केला आहे. कुचिक यांच्याविरोधात विशिष्ट जबाब देण्यास भाग पाडल्याचा आरोप तरूणीने केला आहे. मेसेजचे पुरावेही खोटे असल्याचा दावा तरूणीने केला आहे. या तरूणीच्या आरोपावर भाजप नेते चित्रा वाघ (chitra wagh) यांनी उत्तर दिले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, 18, 19 तारखेला पीडितेची आणि भेट झाली होती. त्यावेळी एकटी मुलगी लढतेय म्हणून तिच्यासोबत मी उभी राहिली. लोकांना जर मदत करायची नसेल तर करू नका पण चुकीचे आरोप करू नका. आज चित्रा वाघविरोधात आरोप केल्यानंतर महिला तिच्यासाठी धावून आल्या. सगळे खडबडून जागे झाले. माझा आवाज बंद कराल, हा तुमचा गैरसमज आहे. जिथं बोलवाल तिथं मी चौकशीसाठी यायला तयार आहे.
तरूणीच्या आरोपाला काय उत्तर दिले?
वाघ म्हणाल्या, ती माझ्यावर असे आरोप का करतेय खरंच कळत नाही. तिचा मेसेज आल्यापासून तिला मदत होण्यासाठी सगळ्यांना तो मेसेज पाठवला. ती मुलगी जे बोलतेय ते सगळे तपासा. माझी सर्व चौकशीसाठी तयारी करा.
तरूणीने काय आरोप केले?
तरूणी म्हणाली, मला कुचिक यांच्याविरोधात विशिष्ट जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले.