- तुषार सोनवणे पुणे : कर्वे रस्त्यावर असणाऱ्या महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. आजपर्यंत या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामावर ५० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नागरिकांचे हे ५0 लाख रुपये पाण्यात जाणार आहेत. कारण, चौकातील प्रस्तावित उड्डाणपूल व मेट्रोचे काम अंदाजपत्रकामध्ये मंजूर झाले आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी उड्डालपूल झाला तर या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला काही अर्थच राहणार नाही. कर्वेपुतळा चौक कोथरूड परिसरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक असल्याने या ठिकाणी वाहतूककोंडी होत असते. महर्षी कर्वेपुतळ्याच्या मागे असलेल्या हॉकर्सच्यासुद्धा रहदारीला अडचणी येत होत्या. त्यामुळे या चौकात ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग, उड्डाणपूल अशा पर्यायांची चाचपणी करण्यात आली होती. महर्षी कर्वेपुतळा असलेल्या जागेपेक्षा मागे सरकविण्यात आल्यास वारज्याकडून येणाºया वाहनांना डीपी रस्त्याकडे वळणे सोपे होईल. त्यामुळे पालिकेकडून पुतळा मागे सरकविणे; तसेच पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. यामुळे नागरिकांना विना अडथळा रस्ता ओलांडता येणार आहे.>कशासाठी खर्च झाले ५० लाखरुपये?महर्षी कर्वेपुतळ्याचे डिजिटल आर्किटेक्चर पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्याप्रकारे डिजिटल आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला आहे; तसेच कर्वेपुतळ्याच्या मेघडंबरीच्या सुशोभीकरणासाठी करण्यात येणार आहे.डिजिटल आर्किटेक्चर पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा वापर न करता, प्रोग्रॅमिंगचा वापर करून होत आहे. पुतळ्याच्या व्यासपीठाचे बांधकामदेखील थ्रीडीलेझर कटिंग, सीएनसी कटिंग, थ्रीडी मिलिंग या प्रकारच्या अत्याधुनिक बनावटीतून साकारण्यात येत आहे. यासोबतच पुतळ्याचा आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यात येणार असून यामुळे चौकाला शोभा येणार आहे. चौकातील अतिक्रमण, तसेच पुतळ्यामागील हातगाड्या हटविण्यात येण्याचा निर्णय महापालिका क्षेत्रीय कार्यालय पातळीवर घेण्यात येणार आहे.अगोदरच या कामासाठी उशीर झाला आहे. उड्डाणपूल व दोन महिन्यांत पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महर्षीकर्वे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल पुणेकरांना पडला होता; परंतु पुणेकरांची प्रतीक्षा थांबली असून कर्वेपुतळ्याचेकाम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याचेपुणे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलेआहे.पुतळ्याच्या नूतनीकरणाला प्रचंड उशीर होत असल्याने पुणेकरांमध्ये विशेषत: कोथरूडकरांमध्ये नाराजी होती. गेली दोन वर्षे पुरेशा निधीअभावी या पुतळ्याचे काम रखडले होते. परंतु, निधीची पूर्तता झाली असून अंतिम टप्प्यात आलेल्या पुतळ्याचे काम आता दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.>समन्वयाचा अभाव नागरिकांचा पैसा पाण्यातमहर्षी कर्वेपुतळ्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतरही दोन-ते तीन वर्षे हे काम रखडले होते. त्याची दोन महत्त्वाची कारणे होती. एक म्हणजे, पालिकेकडून निधी मंजूर झालेला नव्हता. यामुळे पुतळ्याचे काम रखडले होते.दुसरे म्हणजे, या चौकात वाहतूक नियोजनासाठी उड्डाणपुलाचे काम विचाराधीन आहे, प्रकल्प विभाग आणि स्थापत्य विभागात समन्वयाचा अभाव असल्याने हे काम रखडले होते. चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम भविष्यात पूर्ण झाल्यास पुतळ्याचे सुशोभीकरण झाकोळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.>अगोदर या कामासाठी निधीच मंजूर झाला नव्हता. तरीदेखील तात्पुरत्या स्वरूपात निधीची व्यवस्था करून काम जवळ जवळ करण्यात पूर्ण आले. निधीअभावी कामाला उशीर झाला. मेघडंबरी बसविण्यात आली असून, पायाबांधणी आणि इतर महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. किरकोळ सुशोभीकरणाची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. किरकोळ कामे पूर्ण झाल्यास लवकरच पुतळा बसविण्यात येणार आहे. - सुनील मोहिते,शाखा अभियंता, पुणे म.न.पा.
कर्वे पुतळ्याच्या ५० लाखांचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:29 AM