पुणे : तरुणाची दीड लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावणाऱ्या तीन जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुकवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास एम्प्रेस गार्डनजवळ घडली. विशाल सुरेश भालेराव (वय ३२, रा. फौलवाली चाळ, घोरपडी), शाबाज निझाम शेख (वय २५, रा. अलामिन सोसायटी, मार्केट यार्ड) व चंद्रकांत आनंदा ससाणे (वय ४२, रा. फौलवाली चाळ, घोरपडी) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दिनेश पाटोळे (वय ३२, रा. घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. पाटोळे आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पाटोळे शुक्रवारी रात्री एम्प्रेस गार्डनजवळील बंगला क्रमांक दोनसमोरून जात होते, त्या वेळी आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरून नेली होती. पोलिसांकडे तक्रार दाखल करताच आरोपींना अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)
ओळखीच्यांनी लांबवली सोनसाखळी
By admin | Published: March 26, 2017 2:10 AM