पुणे : अाॅक्सफर्ड अाॅफ द इस्ट अशी अाेळख असलेल्या पुण्यात भारतातील विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. दर्जेदार शिक्षण, माेठी परंपरा असलेली महाविद्यालये यांमुळे पुणे हे शिक्षणासाठीचे उत्तम शहर म्हणून अाेळखले जाते. पुण्यातील अनेक ठिकाणांची विविध वैशिष्ट्ये अाहेत. असेच पुण्याच्या अाप्पा बळवंत चाैकाचे सुद्धा एक वैशिष्ट्य अाहे. पुण्यातील अाप्पा बळवंत चाैक अर्थात एबीसी हा पुस्तकांचा चाैक म्हणून अाेळखला जाताे. तुम्हाला हवं असलेलं प्रत्येक पुस्तक या चाैकात तुम्हाला मिळतं. एल. एन. गाेडबाेले यांनी 1950 साली या ठिकाणी पहिले पुस्तकांचे दुकान सुरु केले अाणि बघता बघता या चाैकातील परिसर हा पुस्तकांचा परिसर म्हणून नावारुपास अाला. या ठिकाणी तुम्हाला हवी ती पुस्तके मिळतात. शैक्षणिक साहित्याचं हब म्हणून हे ठिकाण अाेळखलं जातं. अाजमितीला छाेटमाेठी शेकडाे पुस्तकांची दुकाने या ठिकाणी अाहेत. या दुकानांमध्ये खासकरुन शैक्षणिक पुस्तकांच्या दुकानांची संख्या अधिक अाहे. परीक्षांच्या काळात तसेच शाळा, महाविद्यालये सुरु हाेण्याअाधी या ठिकाणी विद्यार्थ्यांची माेठी गर्दी असते. अार्टस असाे, काॅमर्स असाे की सायन्स प्रत्येक विषयाचं पुस्तक तुम्हाला येथे मिळतं. त्याचबराेबर एकाच विषयाची विविध लेखकांची पुस्तकेही हमकास येथे मिळतात.
पुण्यातल्या या चाैकात अाहे ज्ञानाचं भांडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 7:27 PM