शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

नाताळ आला गुलाबी थंडी घेऊन; औरंगाबाद, नागपूर, जळगावचे तापमानही आले १० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 4:05 AM

काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले.

पुणे : नाताळ गुलाबी थंडी घेऊन आल्याने राज्याला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मुंबईकरांनाही सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रविवारी निच्चांकी तापमान गोदाकाठी नाशिकला ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.गेले काही दिवस थंडी, उकाडा, ढगाळ हवामान असा सर्व ऋतुचा अनुभव एकाच दिवसात मिळाल्यानंतर, आता थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे.राज्यात विदर्भातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान१० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे़ उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला असून, खान्देशही चांगलाच गारठला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली असून, पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. पुणे शहरातील किमान तापमानही घटते आहे. शनिवारी या हंगामातील १०़१ इतके किमान तापमान होते़ त्यात रविवारी किंचित वाढ होऊन ते १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सेलिब्रेशनला गुलाबी थंडीची साथ मिळणार आहे.काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे ४़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता २५ मीटरपर्यंतकमी झाली आहे़राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानमुंबई २०़५, सांताक्रुझ १६़६, अलिबाग १७़७, रत्नागिरी १८़४, पणजी १८़८, डहाणू १७, भिरा १४़५, पुणे १०़६, जळगाव १०़२, कोल्हापूर १५़९, महाबळेश्वर १३़३, मालेगाव १०़२, नाशिक ९़५, सांगली १३़७, सातारा ११़४, सोलापूर १३़१, उस्मानाबाद १०़५, औरंगाबाद १०़४, परभणी १०़६, नांदेड १२, अकोला १०़४, अमरावती १२़६, बुलडाणा १४, ब्रह्मपुरी ९़६, चंद्रपूर १३़६, गोंदिया ९़८, नागपूर ९़८, वर्धा १०़९, यवतमाळ १३़(अंश सेल्सिअसमध्ये)

कोल्हापुरात थंडीचा बळीरंकाळा तलाव परिसरात तांबट कमानीजवळ ४५ वर्षांच्या फिरस्त्या पुरुषाचा मृतदेह रविवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांना आढळला. मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणला असता थंडीत गारठून मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. कोल्हापुरात थंडीचा हा पहिला बळी आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून हा फिरस्ता भटकंती करत होता. काही दिवसांपासून एका सिमेंटच्या पाईपमध्ये तो दिवस-रात्र उपाशीपोटी झोपून असायचा. पांघरूण नसल्याने थंडीने हुडहुडत तो झोपलेला असायचा. त्याचा मृत्यू हा थंडीमध्ये गारठून झाल्याचे निदान सीपीआरमधील डॉक्टरांनी केले आहे.