लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची जुडी तब्बल ३५ रुपयांना, तर मेथीची २५ ते ३० रुपयांना जुडीची विक्री केली जात होती. पितृपंधरवड्यामुळे पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. आवक घटल्यानेही दरवाढीवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कोथिंबिरीची एक लाख जुड्यांची, तर मेथीची अवघी ४० हजार जुड्यांची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीची जुडी १० ते २१ रुपये, तर किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपयांना विक्री केली जात होती. विशेष करून शेपू, चाकवत, करडई, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका आणि चवळईच्या भावातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़, तर कांदापात आणि पुदीना यांचे भाव स्थिर असल्याचे पाहायला मिळाले.
पालेभाज्यांचे घाऊक बाजारातील भाव (शेकडा जुडी) :
कोथिंबीर : १००० -२१००, मेथी : १२००-१८००, शेपू : ८००-११००, कांदापात : ७००-१०००, पालक : १०००-१२००, अंबाडी : ५००-६००, चाकवत : ८००-१०००, करडई : ६००-१०००, पुदीना : २००-४००, मुळे : ८००-१३००, राजगिरा : ६००-८००, चुका १४००-१५००, चवळई : ५००-८००.
फोटो : मार्केट यार्डात रविवारी पालेभाज्यांची झालेली आवक.
फोटो - पालेभाज्या