गोहे बुद्रुक येथील युवराज गेंगजे, प्रिया कैलास गेंगजे, सोनी जनार्दन गेंगजे, रामा सोमा गेंगजे, गणेश गोविंद गाडेकर व इतर अनोळखी चार जणांना कैलास उर्फ बाबू दशरथ गेंगजे याचा खून हेमलता घोलप यांच्या मुलाने केल्याचा राग मनात धरून त्यांच्या घरात घुसून १ ऑगस्टला घरातील व्यक्तींना मारहाण केली होती. याप्रकरणी हेमलता घोलप यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. घोडेगाव पोलीस एक महिन्यापासून यातील आरोपींचा शोध घेत होते. यातील मुख्य आरोपी युवराज दशरथ गेंगजे हा खेड येथून वाडामार्गे गावी संगमवाडी येथे येणार असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक गोहे गावाकडे रवाना झाले. पथकातील पोलीस दत्तात्रय जढर व अविनाश कालेकर गोहे गावच्या रस्त्याकडेला दबा धरून बसले व बाकीचे गावाजवळ गाडीत थांबले. थोड्या वेळात युवराज गेंगजे दुचाकीवरून येताना दिसला. पोलिसांना पहाताच तो गाडी भरधाव वेगाने चालवत पळून जावू लागला. पुढे पोलीस ठाण्याच्या गाडीसह उभे असलेल्या जीवन माने व इतर पोलिसांना पाहून युवराज गेंगजे गाडी सोडून पळू लागला. जवळच वाहत असलेल्या ओढ्याच्या पाण्यात त्याने उडी मारली. वरून मुसळधार पाऊस सुरू होता व ओढ्याला देखील पूर आला होता. आरोपी युवराज गेंगजे ओढ्याच्या पाण्यात पोहून जात असलेला पहाताच पोलीस जालिंदर रहाणे, नामदेव ढेंगळे यांनी देखील ओढ्यात उड्या मारून त्याचा पाठलाग सुरू केला. दुसऱ्या बाजूने अविनाश कालेकर व दत्तात्रय जढर हे ओढ्याजवळ आले. आरोपी ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यातून पलीकडे जात असताना पलीकडे हजर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, स्वप्निल कानडे यांनी गाठले. लगेच मागे असलेल्या जालिंदर रहाणे, नामदेव ढेंगळे, दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर यांनी त्याला पकडले.
11092021-ॅँङ्म-ि02 झ्र गोहे बुद्रूक येथे पकडलेला आरोपी युवराज गेंगजे समवेत जीवन माने व इतर पोलीस कर्मचारी.