पुणे : महापालिकेच्य लोकशाही दिनी गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्त कुणाल कुमार उपस्थित राहत नसल्याने आणि थेट अर्ज स्वीकारले जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागरिकांनी आयुक्तांच्या दालनामुळे ठिय्या मांडला. पुणे महापालिकेच्या वतीने आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांप्रमाणे आजही आयुक्त उपस्थित नव्हते. एवढेच नव्हे तर आयुक्त कार्यालयाकडून नागरिकांचे अर्जही थेट स्वीकारण्यास नकार देण्यात आला. आतापर्यंत आयुक्त कार्यलायकडून नागरिकांचे अर्ज थेट स्वीकारले जात होते. मात्र, प्रशासनाने आज अर्ज थेट स्वीकारले जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अर्ज द्या, तेथे काम झाले नाही तरच आयुक्तांकडे या असे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. येथेही १५ दिवसांपूर्वीच दिलेल्या लेखी तक्रारींवर उत्तर मिळेल, असे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. ‘आयुक्तसाहेब बाहेर या’ अशी घोषणाबाजी केली. अनेक नागरिकांना बांधकाम विभागाकडून नोटिसा आलेल्या आहेत. यासंदर्भातील तक्रारी आजच्या लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात स्वीकारल्या गेल्या नाहीत आणि ऐन दिवाळीत या बांधकामांवर कारवाई केली तर कुठे जायचे, अशी भीती नागारिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.या वेळी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले उपस्थित होत्या. पण त्यांनी निवेदने स्वीकारण्यास नकार दिल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला.
लोकशाही दिनी आयुक्तांचा धावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 4:26 PM
सहा महिन्यांपासून आयुक्त कुणाल कुमार उपस्थित राहत नसल्याने आणि थेट अर्ज स्वीकारले जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागरिकांनी आयुक्तांच्या दालनामुळे ठिय्या मांडला.
ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या वतीने आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या सहा महिन्यांप्रमाणे आजही आयुक्त उपस्थित नव्हते. नागरिकांनी संताप व्यक्त केला. ‘आयुक्तसाहेब बाहेर या’ अशी घोषणाबाजी केली.