धायरी: सध्या कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहे. अनलॉकमुळे सिंहगड रस्त्या परिसरातील नागरिक नियम धाब्यावर बसवून गर्दी करत आहेत. मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीही बघायला मिळत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या कोरोनाग्रस्तांची चाचणी करण्यास सुरुवात केली. परंतु सध्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे.
नियमांचे पालन केले नाही तर कमी झालेला आकडा वाढायला वेळ लागणार नाही. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जनता वसाहत, धायरी, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द, आनंदनगर, माणिकबाग, हिंगणे,दत्तवाडी, पानमळा वसाहत, राजीव गांधी वसाहत, दांडेकर पूल, गणेश मळा आदी परिसर येत असून या परिसरामध्ये सध्या रुग्णसंख्या कमी झाली आहे.
चौकट:
सिंहगड रस्ता परिसरात ५१७ ॲक्टिव्ह रुग्ण...
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीत
आत्तापर्यंत ३५,७९५ रुग्णांची नोंद झाली असून
५२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३४, ७५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या ५१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या स्व. मुरलीधर लायगुडे रुग्णालय हे या भागातील एकच कोविड केअर सेंटर असून त्याठिकाणी सध्या २० बेड उपलब्ध आहेत.
पॉइंट्स...
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत...
एकूण लसीकरण केंद्र :१३
आरटीपीसीआर तपासणी केंद्र : २
कोविड केअर सेंटर: १
कोविड सेंटरमधील बेडची संख्या: ५०
१० खासगी रुग्णालये : २५४ बेड उपलब्ध
कोट:
सध्या सिंहगड रस्ता परिसरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी अद्यापही धोका आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर अवघ्या १०० ते १५० लस उपलब्ध असल्याने अनेक नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. महापालिका प्रशासनाने जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर द्यायला हवा.
- महेश पोकळे, विभागप्रमुख, शिवसेना