शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

गतिरोधकांनी मोडले नागरिकांचे कंबरडे

By admin | Published: May 31, 2017 1:41 AM

बारामती न्गगरपालिकेच्या माध्यामतून शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर करण्यात आलेले गतिरोधक वाहनचालकांना अडचणीचेच ठरत आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती न्गगरपालिकेच्या माध्यामतून शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर करण्यात आलेले गतिरोधक वाहनचालकांना अडचणीचेच ठरत आहे. या गतिरोधकांची उंची आणि रूंदी जास्त आहे. मात्र, त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या ओढल्याच नसल्याने अचानक दिसणाऱ्या गतिरोधकांनी ‘कंबरडे मोडल्याच्या’ तक्रारी वाढल्या आहेत. नव्या आणि जुन्या हद्दीत एकूण २४० गतिरोधक केले आहेत. काही ठिकाणी आवश्यकता नसतानाही गतिरोधके टाकल्याची तक्रार आहे. मात्र ज्या ठिकाणी मागणी आहे, तेथे गतिरोधक टाकण्यासाठी मात्र टाळाटाळच होत आहे. दोन वर्षांपूर्वीच नगरपालिकेने जवळपास २३ लाख ६५ रूपये खर्च करून फायबरचे गतिरोधक बारामतीच्या जुन्या हद्दीत बसवले. त्यानंतर लगेच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे केलेला खर्च वाया गेला. ‘नगरपालिकेला निधी मिळतोय मोठा, मग काय, खर्चाला नाही तोटा’ अशा अविर्भात अगोदर फायबरचे गतिरोधक बसवले. फायबरच्या गतिरोधकांची अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच वाट लागली. केलेला खर्च वाया गेला, याला जबाबदार तरी कोण, अशी विचारणा नागरिक विचारत आहेत. त्यानंतर डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे रोडरोलरखाली फायबर गतिरोधकदेखील दबून गेले. त्यानंतर पुन्हा नगरपालिकेला उपरती आली. डांबरीकरणातून पुन्हा गतिरोधक करण्यात आले आहेत. या संदर्भात नगरपालिकेचे नगरअभियंता जीवन केंजळे यांनी सांगितले की, शहरात २४० गतिरोधक केले आहेत. वास्तविक सल्लागार अभियंत्यांनी त्याची पाहणी करण्याची गरज होती. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे उंची आणि रूंदी वाढल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.या गतिरोधकांची उंची आणि रूंदी जास्त झाल्याने वयोवृद्धांना त्याचा त्रास होत आहेच. त्याबरोबर मनक्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकाच रस्त्यावर जागोजागी गतिरोधक केल्यामुळे या त्रासाला समोरे जावे लागत आहे. प्रमाणापेक्षा जास्त उंचीमुळे मनक्याचे आजार जडल्याचे वाहनचालकांनी सांगितले. शहरातील वर्दळीच्या बाजारपेठेतच असंख्य गतिरोधक असल्याने तक्रारी वाढल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांचे अनेक वेळा अपघातनसरापूर : सिंहगडाच्या पायथ्याजवळील हवेली तालुक्यातील अवसरवाडी ते सिंहगड घाट रस्त्याची खड्ड्यांमुळे आणि साईडपट्ट्या उखडल्यामुळे दुरवस्था झाली आहे. यामुळे या भागातून सिंहगडाकडे जाणारे पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी याकरिता अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. अवसरवाडी ते सिंहगड किल्ल्याचा रस्ता हा घाट मार्ग आहे. हा रस्ता वनविभागातून गेलेला आहे. यापूर्वी या घाट रस्त्याचे लोखंडी सळया टाकून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. हा घाट नादुरुस्त रस्ता वनखात्याच्या हद्दीतून गेला आहे. दरम्यानच्या कालावधीत शासनाच्यावतीने या रस्त्यावर टाकलेला निधी वनखात्याने रस्ता अडविल्याने व आडमुठेपणाच्या धोरणामुळे निधी परत गेल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. या वादातच या रस्त्याचे काम अनेक दिवस झाले रखडले आहे.सिंहगडावर जाण्यासाठी या घाट रस्त्याचा पर्यटक व ग्रामस्थ नेहमीच वापरतात. या घाट रस्त्याने कोंढणपूर, रहाटवडे, कल्याण व परिसरातील ग्रामस्थ डोणजेमार्गे पुण्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करीत असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी नागरिकांची वर्दळ चालू आहे. या रस्त्याची खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. तर काही ठिकाणी पुर्वीच्या रस्त्याखाली वापरण्यात आलेल्या लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत.  याकरिता या पावसाळ्यापूर्वी सिंहगड घाट रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून पावसाचे पाणी  वाहण्यासाठी गटारांची दुरुस्ती ताबडतोब संबंधीत प्रशासकिय विभागाने करावी, अशी  मागणी पर्यटकांसह ग्रामस्थांकडून केली आहे.  यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही महिन्यांतच रस्त्यावरील सिमेंट उखडून त्यातील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. यामुळे लहान-मोठी वाहने या सळ्यांत अडकून, वाहने ना-दुरुस्त होत असतात. यात प्रामुख्याने पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांचे अनेक वेळा अपघात झाल्याने अनेक स्थानिक नागरिक जखमीही झाले आहेत.आंबवडे खोऱ्यातील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्यालोकमत न्यूज नेटवर्कनेरे : तालुक्यातील रस्त्यांच्या साईडपट्ट्या खचून रस्त्यावर खड्डे पडणे, रस्त्याचा साईडचा भरावा वाहून जाणे, हे तर नित्याचेच झाले आहे़ मात्र आंबवडे खोऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने या भागातील हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून दररोज प्रवास करावा लागत आहे. येथून वाहन चालविणे म्हणजे एक प्रकारे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखेच आहे की काय, असे वाहनचालकांना वाटू लागले आहे़चाळीसगाव खोऱ्यातील आंबेघरपासून कर्नावड, टिटेघर, कोर्ले, कारी ता़ भोरपर्यंतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची साईडपट्ट्या खचून, खड्डे पडून अतिशय गंभीर अशी अवस्था झाली आहे़ या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा तसेच साईडपट्ट्या खोलवर खचल्याने गाड्या चालविताना कसरत करावी लागते़ या रस्त्यावर वारंवार साईडपट्टीवरून गाडी खाली कोणी उतरवायची यासाठी वाहनचालकांचे तंटे होत असतात. तसेच अपघातही होत आसतात़ या मार्गावरून रायरेश्वर किल्ला, आंबवडेचा झुलता पुल तसेच कान्होजी जेधे यांचा वाडा पाहण्यासाठी दररोज पर्यटकांची गर्दी असते़ रस्त्याची दुरवस्था झाल्याने या भागात पर्यटकांची संख्या कमी होणार आहे़ येणारा पावसाळा सुरू होण्याआगोदर रस्त्याची दुरूस्तीे करण्यात यावी, अशी मागणी होत आहे़