शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

नागरिकांना करावी लागते ‘आधार’ साठी प्रतिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 12:10 PM

काही बँक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे...

ठळक मुद्देशाळांमधील प्रवेश,बँके खाते अशा विविध कारणांसाठी केंद्र शासनाने आधार सक्तीकेवळ आपल्या खातेधारकांनाच आधारची सेवा दिली जात असल्याची तक्रार

पुणे: नागरिकांना आधारकार्ड सहज उपलब्ध व्हावेत आणि आधार यंत्रणा सुरळीत व्हावी या उद्देशाने बँक, टपाल आणि महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरू करण्यात आली. केंद्र शासनाच्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यात १५१ ठिकाणी आधार सेवा दिली जात आहे. मात्र,काही बँक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेमध्ये आधार नोंदणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी नागरिकांना टोकन घेण्याचे बंधन घातले जात आहे.त्यामुळे आधारसाठी नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. शाळांमधील प्रवेश,बँके खाते अशा विविध कारणांसाठी केंद्र शासनाने आधार सक्ती केली होती.त्यामुळे नागरिकांकडून आधारकार्ड काढण्यासाठी अनेक केंद्रांवर गर्दी होत होती.त्यामुळे  शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार केंद्र सुरू करावे,असे आदेश केंद्र सरकारने काढले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ११० बँका आणि ८४ टपाल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी आणि दुरुस्ती सेवा सुरू केली. दरम्यान, महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालय आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या कार्यालयांमध्ये देखील आधार सेवा सुरू झाली आहे. मात्र,नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.     जिल्ह्यातील बहुतांश सर्वच बँका व महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सकाळी दहा वाजता आधारसाठी टोकन दिले जातात. गेल्या वर्षी आधारची कोंडी होत असल्याने टोकन देण्याची पद्धत तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती. मात्र, सद्या:स्थितीत आधार केंद्रांची वाढती संख्या आणि आधार कार्ड काढण्यासाठी येणारे नागरिक यांची संख्या विचारात घेता टोकन घेणे बंधनकारक नाही. तरीही सकाळी दहा वाजता टोकन न घेतल्याची कारणे सांगून आधारच्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना नकार दिला जातो. तसेच बँकांमध्ये केवळ आपल्या खातेधारकांनाच आधारची सेवा दिली जात असल्याची तक्रार काही नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शासन आदेशानुसार प्रत्येक आधार केंद्राच्या  प्रवेशद्वारावर आधार फलक लावण्याचे बंधनकारक असताना पालिकांची क्षेत्रीय कार्यालयांबाहेर आणि बँकांबाहेर फलक लावले गेले नाहीत,असेही दिसून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेbankबँकAdhar Cardआधार कार्ड