शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

‘नाइट लाइफ'मुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:25 AM

विमाननगर, कल्याणीनगर, मुंढवा व कोरेगाव पार्क परिसरात सुरू असलेल्या अनेक बारमध्ये पुन्हा एकदा ‘पब’ सुरू झाले आहेत.

येरवडा : विमाननगर, कल्याणीनगर, मुंढवा व कोरेगाव पार्क परिसरात सुरू असलेल्या अनेक बारमध्ये पुन्हा एकदा ‘पब’ सुरू झाले आहेत. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुरू राहणाऱ्या या पबमुळे या परिसरात पुन्हा एकदा ‘नाइट लाइफ’ची वाईट संस्कृती जोर धरू लागली आहे. रात्र-रात्रभर ‘डीजे’च्या मोठ्या आवाजात ‘डान्स फ्लोअर’वर थिरकणारी तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन वाया जात असून याचा स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी या पबवर तत्काळ कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. यामध्ये अनेक परवाना नसलेले बारही सुरू आहेत.विमाननगर, कल्याणीनगर परिसरात अनेक बारमुळे सध्या नागरिकांना मोकळेपणाने फिरणे अशक्य झाले आहे. कोरेगाव पार्क व मुंढवा परिसरात कहरच माजला असून या भागांमध्ये असंख्य पब सुरू आहेत.या पब व बारच्या नावावरूनच तिथे काय किळसवाणे प्रकार सुरू असतील याची कल्पना येते. यातील काही ठिकाणी हुक्का पार्लरही सुरू आहेत.पबमध्ये रात्रभर धिंगाणा घातल्यानंतर घरी परतताना रस्त्यावरही तरुण व तोकड्या कपड्यातील तरुणींचा धिंगाणा सुरू असतो. नशेच्या अमलाखाली त्यांना कसलेही भान राहत नाही. त्यामुळे अनेकवेळा हे तरुणतरुणी रस्त्यावरच अश्लील चाळे करताना, नाचताना, धिंगाणा घालताना व वेड्यावाकड्या गाड्या चालवताना दिसतात.अनेक वेळा या तरुणी उशिरा रात्री ‘पार्टी’ संपवून घरी परतण्यासाठी एकट्याच रिक्षा अथवा कॅबची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असतात. या सर्व प्रकारांमुळे या तरुणतरुणींच्या जिवाबरोबरच इतर सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत असून या प्रकारांमुळे नागरिक त्रासले आहेत.पोलिस सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात एखादा गंभीर गुन्हा घडल्यास जबाबदार कोण असणार.>पालिका अतिक्रमण विभागाचेही अक्षम्य दुर्लक्षपब व बारमालक हॉटेल परवाना मिळवताना पालिकेत प्रस्ताव दाखल करतेवेळी अतिशय छोटे बांधकाम दाखवतात. प्रत्यक्षात परवाना मिळाल्यानंतर अनधिकृतपणे पक्के बांधकाम करून अथवा शेड टाकून पब व हॉटेलचे आकारमान वाढवले जाते.पालिकेकडे मात्र मूळ प्रस्तावात असलेल्या बांधकामाव्यतिरिक्त मिळकतकर भरणा होत नाही. याबरोबरच पार्किंग, उद्यान, टेरेस, लॉन व लगतच्या मोकळ्या जागेत अशा परवानगी नसलेल्या ठिकाणीही टेबल मांडून सर्व 'सर्व्हिस' दिली जाते.एरवी गरीब व सामान्य नागरिकांच्या अतिक्रमणांवर कारवाईची तत्परता दाखवणारे पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी याबाबतीत मात्र मूग गिळून गप्प बसतात, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nightlifeनाईटलाईफ