पुणे: गाडीखाना दवाखान्यात ढीगभर नगरसेवकांचे नावं असलेले फलक लावण्यात आले. त्यावर मोफत लस मिळेल असे सांगण्यात आले. त्यामळे नागरिकांनी सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर थांबले होते. परंतु अचानक दहा वाजता केंद्राकडून लस मिळणार नसल्याचे फलक लावण्यात आले. आघाडी सरकारचा विजय असो अशा घोषणा देत नागरिकांनी गाडीखाना दवाखान्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.
शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. एका दिवसात तब्ब्ल ५,६ हजारांच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना बेस्ड मिळणेही कठीण झाले आहे. अशाच परिस्थीतीत देशासहित राज्यातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. परंतु मागच्या आठ्वड्यापासून पुणे शहरात लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. नागरिकांना लसीकरण केंद्रावरून लस न घेता माघारी फिरावे लागत आहे. अनेकांनी तर नोंदणी करूनही त्यांना नाकारचे उत्तर ऐकायला मिळत आहे. महापौरांनी पुण्याला लाखांच्या घरात लसीचा पुरवठा झाल्याचे सांगितले आहे. पण केंद्रांवर मात्र लस उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शहरातील अनेक केंद्रांबाहेर लस संपल्याचे सांगण्यात येत आहे.
गाडीखान्यातही मोफत लस मिळत आहे. येथील नगरसवेकांनी त्या दवाखान्याबाहेर नागरिकांना मोफत लस असे ढीगभर नावांचे फलक लावले आहेत. केंद्राकडून लस संपल्याचे फलक लावले आहे. अशा परिस्थितीत आम्ही कुठं जायचे असा सवाल नागरिकांनी आंदोलनात उपस्थित केला आहे.