लोकमत न्यूज नेटवर्कभोर : नगरपलिकेला रिअटर इंडिया कंपनीने तीन घंटागाड्या देऊनही त्या सुरू न केल्यामुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. यामुळे रोगराईत वाढ होत असून, नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे.अपुरे कर्मचारी व अपुऱ्या घंटागाड्या यांमुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यामुळे नगरपलिकेला घंटागाड्यांची अत्यंत गरज होती. अशा वेळी रिअटर इंडिया लिमिटेड कंपनी (विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी एक गाडी ५ लाख ७५ रुपये प्रमाणे सुमारे १७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या भोर नगरपलिकेला ३ घंटागाड्या १४ एप्रिलला दिल्या आहेत. मात्र, त्याला २२ दिवस होऊनही अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. कचऱ्यात मोकाट जनावरे फिरत असून, संपूर्ण कचरा रस्त्यावर येत आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. भोर शहरातील कचरा गोळा करण्यासाठी तीन घंटागाड्या आहेत. मात्र, त्या अपुऱ्या पडत असल्याने संपूर्ण शहरातील कचरा एका वेळी उचलला जात नाही. अजून गाड्यांची गरज होती. तीही आता पूर्ण झाली आहे. मात्र, सदरच्या गाड्यांवर चालकांची नेमणूक करणे, ठेका देणे ही कामे भोर नगरपलिकेकडून अद्याप झाली नाहीत. क चरा गोळा करणाऱ्या गाड्या चार-चार दिवस एका गल्लीत जात नसल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावरील कचराकुंडीत टाकतात, तर काहींनी नवीन कचराकुंड्या तयार केल्या आहेत. नवीन तीन घंटागाड्या आल्या असून, त्यांवर चालक आणि कचरा उचलण्याचा ठेका देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम सुरू झाल्यावर शहरातील कचऱ्याची समस्या कायमची सुटणार आहे.- तृप्ती किरवे, नगराध्यक्ष, भोरकचरा शेतात... ४शहराबाहेर संरक्षक भिंत बांधून राहण्यास व गाडून खत करण्यासाठीची सोय केली होती. मात्र, हे सर्व मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. कचराकुंडीतील कचरा रोजच्या रोज जाळला जात नसल्याने येथील कचरा वाऱ्याने उडून शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. लोकमत न्यूज नेटवर्कभोर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपलिकेच्या पाईपलाईनची दुरुस्ती अद्याप झालीच नाही. त्यामुळे शहराला कमी दाबाने आणि दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत तसल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत.गेल्या आठवड्यात भोर शहराला पाणीपुरवठा करणारी लाईन दोन ठिकाणी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, एकाच ठिकाणची दुरुस्ती झाली असून शिवाजी विद्यालयाजवळची दुरुस्ती अद्याप झालेली नाही.भाटघर धरणावरून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन व जुनी अशा नळपाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. मात्र, जुनी नळपाणी पुरवठा योजना साधारणपणे २५ वर्षांपूर्वीची जुनी आहे. सिमेंटचे पाईप वापरण्यात आले असून पाईप खराब झाले आहेत. त्यामुळे वारंवार ती फुटते. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मोटरशिवाय पाणीच चढत नाही. अनेकदा वीज नसल्यास पाणी भरताच येत नाही. शहरात ठराविक ठिकाणीच हातपंप वगळता नगरपलिकेच्या पाण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. जुनी पाईपलाईन बदलून नियमित व अधिक दाबाने व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले जाते. मात्र, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही.मुख्य वाहिनीवरचे नळ कनेक्शन बंद करावेतभोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनवर अनेकांची नळ कनेक्शन आहेत. त्यांना तीन तास पाणीपुरवठा सुरू राहातो. यामुळे पाणी वाया जात आहे. तर, मुख्य लाईनवरुन अंर्तगत पाईपलाईन काढून त्यावरून घेतलेल्या कनेक्शनला एक तास आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. दोेन्ही नागरिक पाणीपट्टी भरत असल्याने हा दुजाभाव का? त्यामुळे मुख्य लाईनवरची सर्व बेकायदा नळ कनेक्शन काढून टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
भोर शहरात पाणी, कचरा समस्या गंभीर
By admin | Published: May 06, 2017 2:00 AM