पिंपरी : उद्योगनगरीतील आवश्यक मूलभूत सुविधांमुळे आयटी, सॉफ्टवेअर, आॅटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग उत्पादन, संशोधन व विकासाच्या नवीन प्रकल्पांची शहराला पसंती वाढत चालली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत असून, त्याचा फायदा बांधकाम व शॉपिंग मॉल सारखे इतर उद्योग वाढण्यासाठी होऊ लागला आहे. शहरातील भोसरी, चिंचवड, तळवडे, कुदळवाडी आदी भागांत असंख्य लहान-मोठे उद्योग आहेत. लगतच्या हिंजवडीत माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्क वसले आहे. तळेगाव आणि चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक पट्टा आहे. शहरातील औद्योगिक क्षेत्रातील पडीक जागेत उद्योग सुरू करण्यास असंख्य उद्योजक इच्छुक आहेत. यासाठी एमआयडीसीकडे अक्षरश: रांगा लागल्या आहेत. लिलाव पद्धतीने या जमिनीचे वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्येही गुंतवणूक करण्यास अनेक आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या इच्छुक आहेत. या उद्योगात तेजीचे वातावरण असल्याने नव्याने काही कंपन्यांनी प्रकल्प सुरू केले आहेत. त्यामुळे हिंजवडी परिसर आयटी उद्योगासाठी कमी पडत असून, क्षेत्र वाढविण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. तळेगाव आणि चाकण औद्योगिक पट्ट्यात बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय उद्योग येथे व्यवसाय येत आहेत. उत्पादन, संशोधन आणि विकास प्रकल्पांकरिता कंपन्या विचारणा करीत आहेत. जागेची मागणी वाढत असल्याने औद्योगिक परिसराचा विस्तार केला जात आहे. त्यादृष्टीने शासन पावले उचलत आहे. औद्योगिक भागात आॅटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, सॉफ्टवेअर उत्पादन आणि संशोधन करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढत आहे. रोजगार वाढल्याने अनेक जण शहरास वास्तव्यास पसंती देत आहे. साहजिकच निवासी बांधकाम मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषत: वाकड, पिंपळे सौदागर या भागांत आयटी अभियंते राहण्यास अधिक पसंती देत आहेत. तळेगाव आणि चाकणमधील कर्मचारी आणि अधिकारी जवळच राहण्यासाठी या भागांत सदनिका खरेदीस पसंती देत आहेत. राहणीमान सुधारल्याने, तसेच सुशिक्षित वर्ग वाढल्याने शहरात शॉपिंग मॉल, साखळी दुकाने, हॉटेल्सची संख्या वाढत आहे. तसेच, इम्पोर्टेड वाहनांची संख्या शहरात वाढत आहे. शहरात उत्तम सुविधा असल्याने पुणे आणि उपनगरातील मंडळी येथे राहण्यास पसंती देत आहेत. या माध्यमातून शहरात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदनिकांना मागणी मिळत असल्याने बांधकाम क्षेत्रास चालना मिळत आहे. त्यामुळे शहरात अनेक भागांत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. हे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भरपूर वेतन असल्याने शॉपिंग मॉलमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तू खरेदी व हॉटेल्समध्ये खाणे नित्याचे झाले आहे. खरेदीशक्ती वाढल्याने शहराचा झपाट्याने विकास होत आहे. उद्योगाबरोबरच निवासी क्षेत्र विकसित होत असल्याने स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.(प्रतिनिधी)दळणवळण सक्षम : आवश्यक सोईसुविधाशहरातलगत पुणे- मुंबई एक्सप्रेस वे, मुंबई- बंगलोर महामार्ग, पुणे- नाशिक महामार्ग, तसेच जवळच विमानतळ असल्याने दळणवळणाची सक्षम सुविधा आहे. यामुळे उद्योजकांना वाहतूक करणे सुलभ आणि वेगवान झाले आहे. यामुळे या भागात वेगाने उद्योगधंदे वाढत आहेत. औद्योगिकनगरीत उद्योग करण्यास रांगाहिंजवडी आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर कंपन्या उत्सुक तळेगाव, चाकण औद्योगिक पट्ट्यात गुंतवणुकीस प्राधान्यएक्सप्रेस वे, मुंबई- बंगलोर, पुणे- नाशिक महामार्ग, रेल्वे, विमानतळ अशा दळणवळण सुविधाशहरात सुविधा उत्तम असल्याने राहण्यास पसंतीशॉपिंग मॉल, हॉटेल्स, साखळी दुकाने, चित्रपटगृहांची वाढती संख्या नागरिकांना वाहतुकीच्या सुलभ सेवा पूरक उद्योगास फायदा...शहरात निवासी बांधकाम मोठ्या संख्येने होत आहेत. तसेच, शॉपिंग मॉल, प्रसिद्ध साखळी दुकाने, हॉटेल्स, चित्रपटगृहांनी प्रवेश केला आहे. उद्योगांबरोबरच नागरिकांची वाढती पसंती लक्षात घेता शहराचे रूप स्मार्ट सिटीच्या रूपात पालटत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
‘आयटी’ची शहराला पसंती
By admin | Published: October 23, 2015 3:32 AM