पुणे : शहराचे नियोजन करण्यासाठी २०-२० वर्षे लावणारा नगर नियोजन हा विभागच होपलेस आहे, असली भुक्कड संस्था मी आजवर पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या अख्यतारीत असलेल्या नगर विकास खात्यावर निशाणा साधला.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने चांदणी चौकातील उड्डाण पुलासह पुणे जिल्ह्यातील १६ हजार ४३० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे गडकरी यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ‘‘पुण्याच्या विकासाचा विचार तुकड्या-तुकड्यामध्ये न करता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्हा यांचा एकत्रित केला पाहिजे. त्यासाठी व्हिजन तयार केले पाहिजे. नगर नियोजन वगैरे होपलेस आहेत, अशी भुक्कड संस्था मी पाहिलेली नाही. नियोजनाचा आराखडा तयार करण्यासाठी २०-२० वर्षे लावली जातात. सिंगापूर प्लॅनिंग आॅथरिटीसारख्या एजन्सीकडून विकास आराखडा तयार करून घेतला पाहिजे. बाहेरच्या संस्थेकडून पुण्याचा डेव्हलपमेंट प्लान तयार केला तर मुख्यमंत्री त्याला नक्की परवानगी देतील. आतापासून नियोजन केले तर प्रश्न सुटतील.’’ मी आणि मुख्यमंत्री विदर्भाचे असलो तरी आमचे पश्चिम महाराष्टÑाकडेही लक्ष असल्याचे गडकरी या वेळी म्हणाले....अन् शरदपवार यांनी दुरुस्ती केलीकेंद्रात गडकरी यांच्याकडे आम्ही सातत्याने मागण्या घेऊन चाललो आहोत. त्यामुळे एकट्या महाराष्टÑाचे किती प्रस्ताव मंजूर करू, अशी विचारणा ते करीत असल्याचे चंद्रकांत पाटील भाषणात म्हणाले होते. तो धागा पकडत शरद पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी विकासकामांसाठी निधीची मागणी करताना कंजुषी करतात, असे गडकरी यांनीच नागपूरमध्ये भाषणात सांगितले होते. त्यामुळे निधीची मागणी करताना कुठलाही संकोच करू नये. गडकरी यांनी केंद्रात कर्तृत्वाचा ठसा उमटल्याचे गौरवोद्गार पवारांनी काढले.अधिकारी काम करीत नाहीतहीच समस्याविकास योजनांसाठीआता मुबलक पैसा उपलब्ध आहे. शेअर बाजारातून कर्जरोख्यांद्वारेही यासाठी निधी उपलब्ध होत आहे.मात्र आता पैसा ही समस्या नसून अधिकारी कामचकरीत नाही ही खरी समस्या आहे अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.
नगर नियोजन विभाग ‘भुक्कड’ - गडकरींचा मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 6:42 AM