गावांचे एकत्रीकरण करून नगरपालिका आणि महानगरपालिका स्थापन झाली. शहरातील लोकसंख्या वाढीमुळे चार विधानसभा मतदार संघ तयार झाले आहेत. शहरीकरण झपाट्याने झाले असले तरी येथील गावपण टिकून आहे. स्थानिक मंडळांचा, गावपुढाऱ्यांचा येथील राजकारणात प्रभाव, वर्चस्व अबाधित राहिले आहे. येथील निवडणूक असेल किंवा गटातटांच्या राजकारणात येथील आडनावे नेहमीच राजकीय पटलावर झळकत असल्याची दिसतात. भाऊ, मुलगा, बायको घराणेशाहीही येथे आता रूजू लागली आहे. विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. या निवडणूकीत चिंचवड आणि भोसरी या दोन मतदारसंघात प्रमुख पक्षांचे सर्वांधिक उमेदवार हे गाववालेच असल्याचे दिसून येत आहेत. भोजापूर म्हणून परिचित असणाऱ्या भोसरीत लांडगे, लांडे, गव्हाणे, गवळी, फुगे, माने, धावडे, शिंदे ही आडनावे प्रसिद्ध आहेत. तर मोरया गोसावी आणि क्रांतीवीर चापेकर बंधुंमळे प्रसिद्ध झालेल्या चिंचवडमध्ये चिंचवडे, भोईर, गावडे, गोलांडे, निंबाळकर, पडवळ, वाल्हेकर, शेडगे, शिवले ही आडनावे तर आकुर्डीत काळभोर, कुटे, पांढरकर ही नावे, त्यांचबरोबर थेरगावात बारणे, गुजर, डांगे, घोगरे, पवार, पिंपळेसौदागर मध्ये काटे, कुटे, कुंजीर, भिसे, झिंजुर्डे, जाचक, मुरकुटे, धनवटे ही नावे तसेच पिंपळेगुरवमध्ये जगताप, देवकर, काशिद, जवळकर, सूर्यवंशी, कोतवाल, नवले तर सांगवीत शितोळे, ढोरे, पवार, पोंगडे, ढमाले, पिंपळेनिलखमध्ये साठे, नांदगुडे, बालवडकर, इंगवले, दळवी, कामठे आणि कासारवाडीत लांडे, लांडगे, जवळकर, पिंपळे, मोटे, बजबळकर तसेच फुगेवाडीत फुगे, डोंगरे, गायकवाड, डोळस, वाखारे, दापोडीत काटे, कणसे ही आडनावे दिसून येतात. चिखलीत साने, मोरे, नेवाळे, मळेकर, बालघरे आणि, किवळेत तरस, दांगट ही नावे, तर रावेतला भोंडवे, पाळेकर, बहिरट तर पुनावळेत भुजबळ, दर्शिले, मोहिते, बोरगे, ताथवडेत नवले, शिंदे, पवार, वाकडला कलाटे, कस्पटे, विनोदे, वाकडकर, भूजबळ, भूमकर, मानकर,आल्हाट, कर्पे, काळेवाडीत तापकीर, नढे, काळे, तापकीर रहाटणीत नखाते, गोडांबे, कापसे, कोकणे, नढे, भिसे, तर पिंपरीगावात वाघेरे, कापसे, शिंदे, नाणेकर, कुदळे, गव्हाणे, जातक, गोलांडे, रसाळ, तर किवळेश्वराच्या किवळेत तरस, दांगट, नेटके,साबळे, तसेच मोशीगावात बाऱ्हाडे, बारोटे, आल्हाट, सस्ते आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या चऱ्होलीत तापकीर, पठारे, बुरटे, काळजे, तांजणे, खेडकर, मोटे, गिलबिले, बोपखेलमध्ये घुले, देवकर, धोदाडे, तळवडेत भालेकर, बाठे, पिंजन, हगवणे, नखाते, ताथवडेत नवले, पवार, शिंदे, निगडीत काळभोर,पवळे, साकारे ही आडनावे प्रसिद्ध आहेत. पालिकेची निवडणूक किंवा विधानसभा निवडणुकीत यातील नावे झळकली आहेत. (प्रतिनिधी)
शहरातील राजकारण फिरतेय गावकी-भावकीभोवती
By admin | Published: October 13, 2014 12:41 AM