लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरूच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. त्यातच बुधवारी आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविली गेली. बुधवारी दिवसभरात २ हजार ५८७ रुग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ७६९ रुग्णांना घरी सोडले आहे. विविध रुग्णालयांतील ४२५ रुग्ण अत्यवस्थ असून, दिवसभरात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ३२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४२५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ८०५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ११ मृतांची नोंद केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९८० झाली आहे. पुण्याबाहेरील ५ मृत्यूची नोंद केली आहे.
दिवसभरात एकूण ७६९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ३ हजार ७८५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख २३ हजार ७९७ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ३२ झाली आहे.
---
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ११ हजार २३० नागरिकांची स्वॅब तपासणी केली असून आतापर्यंत १२ लाख ७४ हजार ९२६ रुग्णांची तपासणी केली आहे.