लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ई-बसचा वाढता वापर लक्षात घेता पीएमपीएमएल प्रशासनाने सौर ऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास गुरुवारी संचालक मंडळाची मान्यता मिळाली. त्यामुळे आता पीएमपी प्रशासन खासगी संस्थेच्या मदतीने जवळपास ८० हजार युनिट वीजनिर्मिती करणार आहे. यातून ६५० बसेस धावू शकतात.
गुरुवारी आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीत जवळपास २५ विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने नॉन फेयर तिकिटिंग रेव्हनू, सौलर पॅनलद्वारे वीज निर्मिती व दैनंदिन पासच्या तिकीट दरात कपात ह्या प्रामुख्याने तीन विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
भविष्यातला ई-बसचा वाढता वापर लक्षात घेता पीएमपीएमएल प्रशासनाने सौर ऊर्जाद्वारे वीजनिर्मिती व चार्जिंग स्टेशन तयार करणार आहे. यासाठी खासगी संस्थेची मदत घेतली जाईल. पीएमपीच्या सहा डेपोत सोलर पॅनलद्वारे जवळपास २० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाईल. जवळपास ६५० बस गाड्यांना दिवसभरात ८० हजार युनिट गरज भासते. ही गरज सौर ऊर्जातून तयार होणाऱ्या विजेतून पुरवली जाईल, तर दुसरीकडे चार्जिंग स्टेशनतून उरणाऱ्या विजेचा वापर पीएमपीच्या गाड्यासह अन्य खासगी गाड्यांसाठी करता येणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या दीडशे ई-बस आहेत. ऑक्टोबरअखेर १५० बसेस आणि मार्च २०२२ पर्यंत ३५० गाड्या ई-बस धावतील. जवळपास ५०० नवे ई-बस दाखल होणार आहे. तेव्हा ई-बसची संख्या ६५० इतकी होईल.
पीएमपीने यासाठी 13 डेपो व 95 ठिकाणी सौरपॅनल लावले जातील. खासगी संस्था हे स्वतःच्या खर्चाने पॅनल लावणार आहे.
बॉक्स १
पीएमपीचा दैनंदिन पासच्या दरात कपात करण्यात आली. पूर्वी पीएमआरडीएच्या क्षेत्रात बसने प्रवास करण्यासाठी एकदिवसीय पाससाठी ७० रुपये दर आकारण्यात आला होता. तो आता ५० रुपये करण्यात आला. केवळ पुणे अथवा पिंपरी-चिंचवड शहरात फिरण्यासाठी ४० रुपये तिकीट दर आकारण्यात आले आहे.
--------------------
आजच्या बैठकीत जवळपास २५ विषयांवर चर्चा झाली. यात पीएमपीच्या जागेवर सौर ऊर्जा निर्माण करणे, जागेचा वाणिज्य वापर करणे ह्या महत्वचा विषयांना मंजुरी दिली.
- डॉ. चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे