शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

स्वखर्चाने उचलला शहरातील कचरा

By admin | Published: July 25, 2015 4:59 AM

सार्वजनिक स्वच्छतेचा वसा घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याने आणि त्याच्या सहकार्ऱ्यांनी तीन दिवस बारामती शहराच्या विविध भागांतील

बारामती : सार्वजनिक स्वच्छतेचा वसा घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याने आणि त्याच्या सहकार्ऱ्यांनी तीन दिवस बारामती शहराच्या विविध भागांतील कचरा उचलून खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान राबविले. तीन दिवसांत जवळपास ६५ ट्रेलर कचरा उचलून विल्हेवाट लावली. या उपक्रमाचे बारामतीकरांनी कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते अमर धुमाळ, त्यांचे बंधू अभिजित धुमाळ यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्वखर्चातून जेसीबी यंत्रणा लावून हे अभियान राबविले. मागील वर्षी ‘लोकमत’ने ‘आता बास’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्याची दखल धुमाळ बंधूंनी घेतली. शहरातील गल्लीबोळांतील न उचललेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास होत. त्यामुळे एक वेगळा उपक्रम म्हणून त्यांनी शहरातील विविध ठिकाणचा कचरा उचलला. त्याचबरोबर रस्त्यामध्ये झालेला राडारोडा दूर केला. यंदाही माजी मंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविला. कसबा भागातील लेंडीनाला, अण्णा भाऊ साठेनगर, श्रीरामनगर, पंचशीलनगर, जगतापमळा या भागातील मोठ्या प्रमाणात साठलेला कचरा उचलण्यात आला. त्यानंतर शहरातील व्हील कॉलनी, वसंतनगर, अवचट इस्टेट, तपोवन कॉलनी, माता रमाई भवनाचा परिसर, आमराई आदी भागांतील कचऱ्याचे ढीग उचलले. अवचट इस्टेटमध्ये नगरपालिकेने भूमिगत गटार योजना केली आहे. त्यामुळे रस्ता उकरला होता. या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण झाले होते. त्या रस्त्याचे मुरमीकरण व सपाटीकरण केल्याने वाहने चालविण्यासाठी सोयीस्कर झाले. या स्वच्छता अभियानाचे कौतुक बारामतीकरांनी केले. जवळपास ६० ते ६५ ट्रेलर कचऱ्याचे ढीग उचलण्यात आले. या उपक्रमाला विविध पदांवर चांगल्या नोकरीला असलेल्या तरुणांनीदेखील सहकार्य केले. त्यामध्ये फत्तेसिंह गोंडगे, विनय शेलार, अभिजित पाटील, सूरज देशमाने, अक्षय जगताप, भरत काळे, बंटी शिवरकर, नितीन वाघमोडे, आकाश साळवे, अमोल नेवसे, वैभव अडसकर, मनीष काळे, करण देशमाने, सोमनाथ धर्माधिकारी, उद्योजक हेमंत हरनोेळ, नितीन चांदगुडे, प्रकाश शिंदे, हर्षद पवार, आदित्य हेंगणे, राजेंद्र खराडे, सुशील घाडगे, राजेंद्र लोणकर, शरद पवार, शेखर शिंदे, वैभव बोरसे यांनी मोलाचे सहकार्य केले. (प्रतिनिधी)