पुणे : पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा सांधा निसटल्याने बुधवारी शहराच्या मध्यवस्तीतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. याचा मोठा फटका पूर्व भागातील भवानी पेठ, घोरपडी पेठ, गणेश पेठ, कमला नेहरू रुग्णालय परिसर या परिसराचा समावेश आहे, तर पश्चिम भागातील नवी पेठ व लोकमान्यनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय झाली.पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पूर्व भागातील मध्यवस्तींमधील पेठांना पाणीपुरवठा करणाºया सोळाशे व्यासाच्या जलवाहिनीचा सांधा मित्र मंडळ चौकात निसटला. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, या जलवाहिनीचे कामासाठी सायंकाळी या भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गुरुवारी या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम भागातील पाणीटंचाई मध्यवस्तीमधील पश्चिम भागातील लोकमान्यनगर व नवी पेठचा काही भाग, तसेच पाठक बाग, निसेन हर्ट या भागाला गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नगरसेवक महेश लडकत यांच्या तक्रारीनंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी या भागात जाऊन बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर स्वारगेटवरून पाण्याच्या लाईनचा सोडण्यात येणारा व्हॉल्व्ह, तसेच पाण्याच्या टाकीची लेवल तपासण्याचे आदेश दिले आहेत.
शहराच्या मध्यवस्तीचा पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 3:31 AM