पुणे : दौंड येथील दिवाणी न्यायालयातील ३ दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक महेंद्र पगारे यांना ४५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.तक्रारदार व त्यांचे चुलत भाऊ यांचे एकूण ३ दावे दौंड दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ठ होते़. या दाव्याचा निकाल साहेबांकडून तक्रारदार यांच्या बाजूने लावून देण्यासाठी महेंद्र पगारे यांनी ४५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़. या तक्रारीची ३ एप्रिल रोजी पडताळणी केली गेली़. हडपसर येथील मगरपट्टा रोडवरील कालिका एंटरप्रायझेस या दुकानासमोरील फुटपाथवर पैसे घेऊन बुधवारी रात्री साडेसात वाजता बोलविले होते़. त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा रचला़. तक्रारदार यांच्याकडून ४५ हजार रुपये स्वीकारताना महेंद्र पगारे (वय ५७, रा़ साई सुलोचना अपार्टमेंट, घोरपडी) यांना पकडण्यात आले़. त्यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे़. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे़.
दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 9:05 PM
दौंड येथील दिवाणी न्यायालयातील ३ दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक महेंद्र पगारे यांना ४५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : निकाल बाजूने देण्यासाठी घेतले ४५ हजार