पुणे : शहरातील विधानसभेच्या आठही मतदारसंघावर दावा करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक इश्यू तयार करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. लोकसभेच्या निवडणूकीतून रिकामे झाल्यानंतर लगेचच भाजपाने विधानसभेच्या निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पक्षाच्या बूथकेंद्र प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुखांची तसेच शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात युती असली तरीही त्याचा दबाव न बाळगता आठही विधानसभा मतदारसंघावर दावा करण्याचे ठरवण्यात आले. हे आठही मतदारसंघ सध्या भाजपाकडेच असून भाजपा अनेक वर्षांनंतर प्रथमच अशा मजबूत राजकीय स्थितीमध्ये आहे. त्यामुळेच युतीमध्ये जे व्हायचे ते जागा वाटप होऊ द्या, त्यावेळी ते मान्य करू, मात्र आज दावा करताना आठही मतदारसंघांवर करायचा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.लोकसभेच्या मतदानाची बूथनिहाय आकडेवारी आता बूथकेंद्र प्रमुख तसेच शक्तीकेंद्र प्रमुखांकडे आली आहे. त्यावरून काही विशिष्ट स्वरूपाचे विश्लेषण करण्याचा आदेश या बैठकीत कार्यकर्त्यांना देण्यात आला. त्यात प्रामुख्याने झालेल्या मतदानापैकी किती मतदान भाजपाचे असेल याचा अंदाज, मतदान कमी झाले असेल तर त्याची कारणे, कार्यकक्षेतील सोसायट्यांची संख्या व तिथे झालेले मतदान, झोपडपट्टी परिसरातील मतदान किती आहे, कमी झाले असेल तर त्याची कारणे ही माहिती बूथकेंद्र प्रमुखांनी उपलब्ध आकडेवारीवरून तयार करावी असे सांगण्यात आले.आठही विधानसभा मतदारसंघाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यातील प्रमुख समस्या कोणत्या, निवडणूकीमध्ये कोणत्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे, कोणत्या समस्या तत्काळ सोडवण्यात आल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो हीसुद्धा माहिती कार्यकर्त्यांनी जमा करायची आहे. येत्या सोमवारी (दि.१३) होणाºया बैठकीत त्यांनी ही माहिती सादर करायची आहे. लोकसभा मतमोजणीसाठी प्रतिनिधी निश्चित करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी नावे देण्यास सांगण्यात आले. .................प्रदेशचा निर्णय मान्य असेलशहरातील आठही विधानसभा मतदारसंघात आज भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे आम्ही सर्व जागांचा दावा करण्यात काहीच गैर नाही, मात्र यासंबधीचा निर्णय, म्हणजे युतीचे जागा वाटप प्रदेश स्तरावर होणार आहे. शहर शाखेच्या कार्यकक्षेत ते येत नाही, पण जागा आमच्या असल्यामुळे आम्ही त्या आमच्याकडेच ठेवा अशी मागणी नक्कीच करणार आहोत. प्रदेश शाखा घेईल तो निर्णय आम्हाला अर्थातच मान्य असेल.योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजपा
विधानसभेच्या आठही जागांवर दावा करणार : शहर भाजपाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 9:00 AM
लोकसभेच्या निवडणूकीतून रिकामे झाल्यानंतर लगेचच भाजपाने विधानसभेच्या निवडणूकीची तयारी सुरू केली आहे.
ठळक मुद्देमतदारसंघनिहाय इश्यू निश्चितीचे आदेशयुतीमध्ये जे व्हायचे ते जागा वाटप होऊ द्या, त्यावेळी ते मान्य करू,