पुणे : शहनाईवादक वसंतराव केशवराव गायकवाड (वय ८६) यांचे शुक्रवारी (दि. २३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शहनाई सुंद्रीवादक डॉ. प्रमोद गायकवाड यांचे चुलत बंधू होतं.
वसंतराव गायकवाड यांचा शहनाईवर मराठी सुगम संगीत वाजविण्यात विशेष हातखंडा होता. गायकवाड घराण्याची शहनाई सुंद्रीवादन परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे अनेक वर्षे त्यांनी आपली शहनाईवादन सेवा रुजू केली होती. पुणे व भारतातील विविध शहरांमध्ये त्यांच्या शहनाई वादनाचे अनेक कार्यक्रम झाले. जवळपास ३० ते ३५ वर्षे त्यांनी राज्य सरकारच्या फोटोझिंको मुद्रणालयात नोकरी केली. या काळात त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेने देखील त्यांचा गौरवपदक देऊन विशेष सन्मान केला.
----------------------------------