आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडीच्या टोलनाक्यावर स्थानिक आणि टोलकर्मचारी यांच्यात पुन्हा एकदा राडा झाला. तालुक्यातील वाहनांना टोल माफ असताना टोल मागितल्याने झालेल्या वादविवादात टोल कर्मचारी यांनी मारहाण करून सोन्याची चैन हिसकावून घेतल्याची तर कर्मचारी यांना मारहाण व दागिने हिसकावून घेतल्याच्या परस्पर विरोधी फिर्यादी आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. आळेफाटा पोलिसांत संदीप प्रभाकर मुळे (रा. मांजरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व इतर सहकारी हे आळेफाटा येथून नारायणगाव बाजूला जात असताना रविवारी रात्री आठच्या सुमारास चाळकवाडी टोलनाक्यावर गर्दी लवकर काढायला सांगत व स्थानिक असल्याचा पुरावा दिल्यानंतरही टोल मागणी केली. या कारणाने तेथील पाच कर्मचारी व इतर यांनी गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व वाहनाचे नुकसान केले. तर संतोष अनंथा सोनवणे (रा. चाळकवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी रात्री आठच्या वेळेला टोलनाक्यावर नारायणगावकडे जाणारे संदीप मुळे यांचे वाहनाला टोल मागितल्याच्या कारणाने त्यांनी व इतर यांनी दोन तोळे सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून घेत मारहाण केली. टोलनाक्यावरील या प्रकरानंतर ग्रामस्थांनी तेथील टोलनाक्यावर आंदोलन करत टोल नाका काही वेळ बंद केला. तर शिवसेना गटनेत्या आशा बुचके, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, नारायणगाव सरपंच योगेश पाटे यांनी आळेफाटा पोल१स ठाण्यात टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्याबद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण व दरोडा हे गुन्हे दाखल केले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक मारूती खेडकर पुढील तपास करत आहे. तर सकाळी काही तास हा टोलनाका बंद होता. याबाबत माहिती समजू शकली नाही.
पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलवर पुन्हा राडा; परस्पर विरोधी तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 4:40 PM
पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडीच्या टोलनाक्यावर स्थानिक आणि टोलकर्मचारी यांच्यात पुन्हा एकदा राडा झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
ठळक मुद्देस्थानिक आणि टोलकर्मचारी यांच्यात राडा, पोलिसांनी दाखल केले गुन्हेसकाळी काही तास बंद होता टोलनाका