जुन्नर : आदिवासी भागातील इंगळुण गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याने दोन्ही गटांच्या २५ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इंगळुण गावातील देवीच्या यात्रेसाठी मोटार सायकलवरून जात असलेले गणेश डामसे यांना एका जीप गाडीचा धक्का लागला. याबाबत जीप चालकाला विचारणा करीत असताना दोघांत वाद झाला. जीप गाडीत बसलेले शिवाजी रावते, मुकुंद रावते, सुनील उंडे, संदीप रावते, सत्यवान उंडे, सचिन उंडे, कल्पना रावते, इंदूबाई ढेगले, चंद्रभागा ढेंगले (सर्व रा. सोनावळे, महावीरवाडी) यांनी लोखंडी गज व लाकडी दांडक्यांनी गणेश डामसेला मारहाण केली. यानंतर गणेश याने ही आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले.भगवान डामसे, जालिंदर डामसे, अक्षय डामसे, योगेश डामसे, मुकेश डामसे, अमोल डामसे, कैलास डामसे, नितीन डामसे, अंकुश डोळस, यदू डोळस, दिनकर डामसे व लिलाबाई डामसे (सर्व रा. इंगळुण) यांनी दुसऱ्या गटातील लोकांना शिवीगाळ करीत लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोन्ही गटातील आरोपी जखमी झाले असून दोन्ही गटातील परस्परविरोधी तक्रारी जुन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या.
दोन गटांत हाणामारी
By admin | Published: April 20, 2017 6:40 AM