शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अभाविप-एनएसएयूआय विद्यापीठात एकमेकांना भिडले : नक्षलवाद विषयक पुस्तके विक्रीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 7:04 PM

समाजामध्ये दुही पसरवणा-या आणि जातीयवादी पुस्तकांची विक्री केली जात असल्याचा आरोप करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तक विक्रीस विरोध केला.

ठळक मुद्देघोषणाबाजीमुळे गोंधळाचे वातावरण

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ आवारात परवानगीशिवाय स्टॉल उभा करून जेएनयु राष्ट्रविरोधी रोजनिशी डायरी तसेच नक्षलवाद या विषयावरील वादग्रस्त पुस्तकांची विक्री केली जात असल्याचा आरोप करून अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने पुस्तक विक्रीस विरोध केला. त्यातून अभाविप व एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे विद्यापीठात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.  विद्यापीठातील अनिकेत कँन्टीनजवळ विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीशिवाय पुस्तक विक्रीचा स्टॉल लावून पुस्तकांची विक्री व काही पुस्तकांचे वाटप केले जात होते. त्यात समाजामध्ये दुही पसरवणा-या आणि जातीयवादी पुस्तकांची विक्री केली जात असल्याचा आरोप करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तक विक्रीस विरोध केला. विना परवानगी सुरू केलेला पुस्तक विक्रीचा स्टॉल काढण्याच्या सुचना विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या अधिका-यांनी संबंधित स्टॉल धारकाला केल्या होत्या.मात्र,तरीही हा स्टॉल सुरू ठेवण्यात आला. विद्यापीठातील अभाविचा विद्यार्थी कार्यकर्ता सचिन लांबुटे याने या स्टॉलला भेट दिली.त्यावेळी त्याला समाजात दुही पसरवणा-या आणि नक्षलवादाला समर्थन करणारी पुस्तके वाटली जात असल्याचे दिसून आले. यावर विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली असता, प्रशासनाच्या परवानगीशिवाय असा प्रकार घडत असल्याचे अभाविपच्या कार्यकर्त्यांना दिसून आले.त्यामुळे विद्यापीठात एनएसयुआय व अभविपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद  निर्माण झाला. हा वाद मिटविण्यासाठी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला पोलिसांना पाचारण करावे लागले.परिणामी विद्यापीठ प्रशासनाने येथील दोन्ही पुस्तक विक्रीचे स्टॉल बंद केले. तर परवानगीशिवाय पुस्तक विक्री करणा-यांवर विद्यापीठ प्रशासनाने कडक कारवाई करावी,या मागणीचे निवेदन अभाविपतर्फे विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ