पुणो : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर/ऑक्टोबर 2क्14 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. त्यात दहावीचा एकूण निकाल 29.25 टक्के लागला असून, बारावीचा निकाल 26.77 टक्के लागला आहे.
गेल्या वर्षापेक्षा निकालाच्या टक्केवारीचा विचार करता यंदा दहावीचा निकाल 11.4ने तर बारावीचा निकाल 5.क्2 टक्क्यांनी वाढला आहे. यंदा दहावी व बारावीच्या ऑक्टोबर परीक्षांच्या निकालात औरंगाबाद विभागाने बाजी मारली आहे.
पुणो, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 18 सप्टेंबर 2क्14 ते 11 ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत दहावीची परीक्षा तर 18 सप्टेंबर ते 2क् ऑक्टोबर या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी 1 लाख 37 हजार 966 विद्याथ्र्यानी नोंदणी केली होती. त्यातील 1 लाख 35 हजार 916 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 39 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकालाची टक्केवारी 29.25 आहे. बारावीच्या परीक्षेसाठी 95 हजार 676 विद्याथ्र्यानी नोंदणी केली होती. त्यातील 39 हजार 51क् विद्याथ्र्यानी परीक्षा दिली. त्यापैकी 25 हजार 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 26.77 लागला आहे.
दहावीचा निकाल
विभागीय मंडळ टक्केवारी
पुणो3क्.29
नागपूर31.84
औरंगाबाद33.15
मुंबई25.88
कोल्हापूर3क्.क्2
अमरावती28.72
नाशिक29.क्5
लातूर26.क्4
कोकण 22.48
4 डिसेंबरला गुणपत्रिकांचे वितरण
4राज्य शिक्षण मंडळातर्फे ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला असून, येत्या 4 डिसेंबर रोजी विद्याथ्र्याना संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत गुणपत्रिकांचे वितरण केले
जाणार आहे.
औरंगाबादची आघाडी
4यंदा निकालात औरंगाबाद विभागाने आघाडी घेतली आहे. दहावी व बारावीच्या निकालात औरंगाबाद प्रथम क्रमांकावर आहे. दहावीचा
सर्वात कमी निकाल कोकण विभागाचा लागला असून, बारावीचा सर्वात कमी निकाल पुणो विभागाचा आहे.
बारावीचा निकाल
विभागीय मंडळ टक्केवारी
पुणो 2क्.76
नागपूर 28.96
औरंगाबाद 35.43
मुंबई 27.95
कोल्हापूर 25.12
अमरावती 27.76
नाशिक 24.36
लातूर 33.86
कोकण 22.34