स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथे या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व विद्यार्थ्यांबरोबरच पंचवीस वर्षांपूर्वी जे शिक्षक या शाळेमध्ये ज्ञानदानाचे काम करत होते ते सर्व शिक्षकही उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समिती सदस्य शंकरराव कामथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे, बळवंतराव गरुड, संकेत कामथे, एस. एन. खोबरे, पी.एन.बगाडे, पी. एस. साळवी, एन. एच. निकम, बापू वाटेगावकर, जयंतकुमार दाभाडे, जगदाळे यांच्यासह प्राचार्य शहाजी कोळेकर अनेक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात रघुनाथ वाहुळ यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने सपत्निक सत्कार करण्यात आला, तर नवनाथ कामथे यांची शाळा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना तत्कालीन शिक्षकांनी यमाई मातेच्या मंदिरात भरणाऱ्या या शाळेत आपली नोकरीची सुरुवात झाली. नवीन विषय शिकवण्यास मिळाले, मुलांच्या मनावर चांगल्या गोष्टी बिंबवता आल्या, शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते अनुभवयास मिळाले, उत्कृष्ट विद्यार्थी घडविता आले, देणारा महान असतो पण घेणाराही गुणवंत असावा लागतो हे आजच्या सोहळ्यातून अनुभवयास मिळाले व मी समाजाचे देणे लागतो ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविता आले याचे फार मोठे समाधान वाटत असल्याच्या अनेक प्रतिक्रिया आल्या.
सन्मानाला उत्तर देताना नवनाथ कामथे यांनी संस्थेला मदत करताना विद्यार्थीप्रिय उपक्रम राबवत पटसंख्या वाढवणे, स्पर्धापरीक्षेसाठी विद्यार्थी घडविण्यात भर देणार असल्याचे सांगितले. तर रघुनाथ वाहुळ यांनी २३ वर्षे या शाळेत सेवा करण्याची संधी मिळाली याची उतराई करत असताना दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली.
भावी पिढीने पुढे येथे यावे, सुख-दुःख वाटण्याचे काम करावे, मुळ मातीशी प्रामाणिक राहा, संघटित राहा, गरीब मुलांना दत्तक घ्या व शाळेचे नाव चिरकाल टिकवण्याचा प्रयत्न करा, असे सुदामराव इंगळे यांनी सांगितले.
वयाच्या चाळिशीत, पंचवीस वर्षांनंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वजण जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता व पुन्हा तेच दिवस, तिच शाळा, तेच विद्यार्थी, तेच शिक्षक अविस्मरणीय क्षण आज अनुभवयास मिळाले व शाळा सोडताना सर्वांचा कंठ दाटून आल्याची भावना नीता कामथे-गायकवाड यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन अविनाश जाधव यांनी केले.
180821\1625-img-20210817-wa0042.jpg
२५ वर्षापूर्वीचे विध्यार्थी शिक्षक व इतर मान्यवर