शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

दहावीची पाठ्यपुस्तके आजपासून मिळणार, विद्यार्थी व पालकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 4:23 AM

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळा (बालभारती)च्या वतीने इयत्ता दहावीची नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मंगळवार (दि. ३) पासून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून पुस्तकांच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे  - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळा (बालभारती)च्या वतीने इयत्ता दहावीची नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मंगळवार (दि. ३) पासून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून पुस्तकांच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीसह आठवी व पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. ज्ञानरचनावाद या रचनेवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना केवळ घोकंपट्टी न करता कृतीतून शिक्षण देण्याच्यादृष्टीने पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी व पालकांना इयत्ता दहावीच्या पुस्तकांची प्रतीक्षा होती. ‘बालभारती’कडून दरवेळी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेत उपलब्ध करून दिली जातील, असे सांगितले जाते. त्यामुळे यंदा तरी दहावीची पुस्तके वेळेत मिळणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. इयत्ता नववीची परीक्षा संपल्यानंतर बहुतेक शाळांमध्ये दहावीचे वर्ग सुरू केले जातात.एप्रिल महिन्यापासूनच वर्ग सुरू होत असल्याने पुस्तके वेळेत मिळावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, शिक्षकांना होती. अखेर बालभारतीने दहावीच्या सर्व माध्यमांतील पाठ्यपुस्तके मंगळवारपासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे.बालभारतीच्या राज्यातील सर्व दहा भांडारांत नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. वितरक, विक्रेत्यांकडून मंगळवारी या भांडारातून पुस्तके घेतल्यानंतर लगेचच बाजारातही ही पुस्तके विद्यार्थी-पालकांना विक्रेत्यांकडून खरेदी करता येतील. यामध्ये दहावीच्या सर्व माध्यमांतील पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे, अशी माहिती बालभारतीकडून देण्यात आली.दरम्यान, दहावीची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असली तरी अद्याप इयत्ता पहिली व आठवीच्या पुस्तकांबाबत बालभारतीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.पुस्तकांच्या किमती वाढल्याइयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या किमती काहीशा वाढलेल्या आहेत. सर्व पुस्तके एकूण ६६४ रुपयांना उपलब्ध होणार आहेत.विषय पूर्वीची किंमत नवीन किंमत (रुपयांत)कुमारभारती ६१ ७३हिंदी ६५ ५७इंग्रजी ९८ ८८विज्ञान ९१ १४०इतिहास ५४ ५६भूगोल ५४ ४३बीजगणित ६३ ८०भूमिती ७१ ७७

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिक