शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

वर्गीकरण, कोटेशनमध्ये अंदाजपत्रक ठप्प,  एकूण भांडवली खर्चापैकी २० ते २५ टक्केच खर्च, भाजपाच्या सत्ताकाळाचे पहिले वर्ष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 3:34 AM

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर सत्तेचे त्यांचे पहिलेच वर्ष बिनकामाचे वर्ष म्हणून स्वीकारण्याची नामुष्की येण्याची वेळ आली आहे.अंदाजपत्रकातील एकूण भांडवली खर्चापैकी आतापर्यंत फक्त २० ते २५ टक्केच खर्च झाला असून बहुतेक कामे वर्गीकरण, कोटेशन यातच अडकली आहेत. बांधील खर्च व झाडणकामासारख्या कामांसाठी अन्य योजनांमधून पैसे वर्ग करून घेणे ...

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर सत्तेचे त्यांचे पहिलेच वर्ष बिनकामाचे वर्ष म्हणून स्वीकारण्याची नामुष्की येण्याची वेळ आली आहे.अंदाजपत्रकातील एकूण भांडवली खर्चापैकी आतापर्यंत फक्त २० ते २५ टक्केच खर्च झाला असून बहुतेक कामे वर्गीकरण, कोटेशन यातच अडकली आहेत. बांधील खर्च व झाडणकामासारख्या कामांसाठी अन्य योजनांमधून पैसे वर्ग करून घेणे यातच भाजपाचा वेळ चालला आहे.यावर्षीचे अंदाजपत्रक मार्च महिना संपल्यावर जूनच्याही मध्यावर जाहीर झाले. सत्ता मिळाल्यानंतरचे हे पहिलेच अंदाजपत्रक असल्याने बºयाच चमकत्या योजना मांडण्यात आल्या. फक्त भांडवली खर्चासाठी म्हणून या अंदाजपत्रकात तब्बल ३१६२ कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. शहरातील विकासकामांसाठी म्हणून हीच कामे महत्त्वाची असतात. नगरसेवकांचीही अनेक कामे त्यात असतात. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत यातील फक्त २० टक्के रक्कमच खर्च झाली आहे. प्रशासनही त्यामुळे चिंतीत झाले आहे.नगरसेवक आधी सुचवलेली कामे बदलून मागत आहेत, त्यासाठी वर्गीकरणे केले जात आहे, काही आवश्यक कामे करणाºया कर्मचाºयांच्या वेतनासाठीची तरतूद कमी केली गेली, आता ती कामे अडली असल्यामुळे प्रशासन सायकल खरेदीसारख्या योजनांवरची तरतूद या कामगारांच्या वेतनाकडे वर्ग करून घेत आहेत. त्याशिवाय नगरसेवकांची कामे अभियंत्यांनी कोटेशन, निविदा प्रक्रिया यातच अडकून ठेवली आहेत. महापालिकेत सध्या रोज असाच प्रकार सुरू असून, प्रत्यक्ष कामे काही व्हायला तयार नाहीत. त्यामुळे आता सत्ताधारी भाजपाचे शहरातील कार्यकर्तेही कुजबूज करू लागले आहेत.केंद्र सरकारचे वस्तू व सेवा कर (जीएसटी) सारखे निर्णयही महापालिकेचे अंदाजपत्रक रखडवण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. जीएसटीमुळे प्रशासनाने बांधकाम साहित्याचे दर कमी होणार असल्यामुळे प्रशासनाने त्यानंतर जाहीर झालेल्या सर्व विकासकामांच्या निविदा थांबवल्या. कोणत्या साहित्याचा दर किती कमी किंवा जास्त झाला त्याचा अभ्यास करून त्यानंतर निविदांची मूळ रक्कम निश्चित करण्यात आली. त्यानुसार फेरनिविदा काढण्यात आल्या. ती प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळेही अनेक विकासकामे अजूनही निविदांच्या स्तरावरच आहेत. प्रशासन हे करत असताना पदाधिकाºयांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.भांडवली खर्चाचे ३१६२ कोटी रुपये महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये वाटून देण्यात आले आहेत. त्या त्या खात्याने त्यांची कामे पुढे नेणे अपेक्षित असते. मात्र तसे झालेले दिसत नाही. कारण या खात्यांनी त्यांच्या झालेल्या खर्चाची त्रैमासिक आकडेवारी महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाकडे देणे गरजेचे असते. तशी आकडेवारी या विभागाकडे अजून आलेलीच नाही. विचारणा केली असता बहुसंख्य खात्यांकडून अद्याप खर्च झालेला नाही असेच सांगण्यात येत आहे.बांधकाम, भवन, पाणीपुरवठा, विद्युत, उद्यान, अग्निशमन, घनकचरा, आरोग्य, मिळकत कर, याशिवाय महापालिकेचे अनेक विभाग आहेत. त्यापैकी बहुतेकांच्या कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. प्रभागस्तरापासून ते थेट मुख्यालय स्तरापर्यंत अशीच स्थिती असल्याचे दिसत आहे.लवकरच कामे सुरू होतीलअंदाजपत्रकाची अंमलबजावणी लांबली आहे. महापालिकेची निवडणूक, त्यानंतर जीएसटीसारखे निर्णय अशी त्याची कारणे आहेत. मात्र आता त्याला गती मिळेल. त्यासाठी लवकरच प्रशासनाबरोबर नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली. येत्या काही महिन्यांमध्ये प्रत्यक्ष अनेक कामांना सुरुवात होईल अशा विश्वास आहे.- मुरलीधर मोहोळ,अध्यक्ष स्थायी समितीनियोजनाचा अभावसत्ताधा-यांकडे नियोजन नाही हेच यातून सिद्ध होत आहे. सत्ताधारी नगरसेवकांना त्यांनी प्रत्येकी ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला. विरोधकांना फक्त २ कोटी रुपये दिले आहेत. इतके पैसे असूनही सत्ताधाºयांना कामे करता येत नाहीत ही लाजीरवाणी बाब आहे. शहराच्या विकासावर याचा परिणाम झाला आहे.- चेतन तुपे, विरोधी पक्षनेताअंदाजपत्रक उशिरा सादरआम्ही खात्यांकडे त्यांच्या झालेल्या खर्चाची माहिती मागवतो आहोत. ती अद्याप मिळालेली नाही. नक्की किती टक्के खर्च झाला हे त्यामुळे सांगता येणार नाही. अंदाजपत्रक उशिरा सादर झाले, त्यानंतर जीएसटीमुळे थोडा फरक पडला. येत्या महिन्यामध्ये कामांना गती येऊन रकमा खर्ची पडतील.- उल्का कळसकर, मुख्य लेखाव वित्त अधिकारी, महापालिका