शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

स्वच्छ पुणे अस्वच्छ पालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 11:27 AM

रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेकडून जाेरदार कारवाई करण्यात येत अाहे. परंतु पालिकेच्या इमारतीमध्येच अनेक ठिकाणी थुंकलेले अाहे. त्यामुळे पालिकेत देखील कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राहुल गायकवाड / तन्मय ठाेंबरेपुणे :  पुणे महानगरपालिकेकडून पुण्याला स्वच्छ करण्याची माेहिम हाती घेण्यात आली अाहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंडच नाहीतर त्यांना रस्ते पुसून घ्यायची शिक्षा दिली. त्याचबराेबर रस्त्यावर कचरा टाकणारे व लघवी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत अाहे. असे असताना महापालिकेतील चित्र मात्र वेगळेच अाहे. महापालिका रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करते मात्र महापालिकेच्या इमारतीच्या काेपऱ्यांमध्ये थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई हाेणार का असा प्रश्न निर्माण झाला अाहे. महापालिकेच्या इमारतीमधील जवळजवळ सर्वच काेपऱ्यांमध्ये गुटखा खाऊन थुंकलेले अाहे. त्यामुळे महापालिकेचा दिव्याखाली अंधार असाच काहीसा प्रकार सुरु अाहे.

    2 नाेव्हेंबर पासून पुणे महानगरपालिकेकडून विशेष माेहीम हाती घेऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावर कचरा फेकणारे तसेच सार्वजनिक ठिकणी लघवी व शाैचास बसणाऱ्यांवरही जाेरदार कारवाई करण्यात अाली. 2 नाेव्हेंबर ते 23 नाेव्हेंबर या दरम्यान पालिकेकडून तब्बल 2858 नागरिकांवर कारवाई करण्यात आली अाहे. त्यांच्याकडून 5 लाख 29 हजार 635 रुपये इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे. या माेहिमेचे सर्वच स्तरातून काैतुक हाेत असताना महापालिका इमारत ही सुद्धा सार्वजनिक इमारत अाहे याचा पालिका अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे चित्र अाहे. पालिकेच्या इमारतीमधील अनेक काेपऱ्यांमध्ये तसेच जिन्यांमध्ये थुंकल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीमध्ये अाढळून अाले. पालिकेत विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून तसेच पालिका कर्मचाऱ्यांकडून सुद्धा पालिकेच्या इमारतीमधील भिंतींवर थुंकण्यात येते. जुन्या इमारती बराेबरच नवीन इमरतीमध्ये देखील काही ठिकाणी थुंकलेले अाढळले. पालिकेच्या सर्वच मजल्यांवर सारखेच चित्र हाेते. लाेकमतचे प्रतिनिधी पाहणी करत असताना प्रतिनिधीच्या समाेरच पालिकेतील एक सुरक्षारक्षक इमारतीमध्ये थुंकला. त्यावर कुठलिही कारवाई करण्यात अाली नाही. त्यामुळे पालिका ज्याप्रमाणे रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कारवाई करते तशी कारवाई पालिकेत देखिल करणार का असा सवाल उपस्थित केला जात अाहे. 

     

याबाबत पालिकेच्या घणकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर माेळक यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, पालिकेच्या इमारतीच्या भिंतींवर थुंकणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येत अाहे. मागच्याच अाठवड्यात अशी कारवाई करण्यात अाली. तसेच पालिकेच्या सात कर्मचाऱ्यांना दंड देखील ठाेठावण्यात अाला अाहे. तसेच पालिकेच्या सर्व विभागांना स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात अाल्या अाहेत.  

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMukta Tilakमुक्ता टिळक