स्वच्छ सर्वेक्षणात झालेल्या शहराच्या घसरगुंडीवरून विरोधकांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 03:51 PM2019-03-07T15:51:23+5:302019-03-07T15:53:04+5:30
शहरातील कचरा, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात दहाव्या क्रमांकावरून १४ व्या क्रमांकावर पालिकेची घसरगुंडी झाली.
पुणे : स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेची घसरण झाली असून एवढा खर्च करून ही स्थिती का ओढवली याचा विचार व्हावा तसेच दोषी अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी अशी मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी मुख्य सभेत आंदोलन केले.
यावेळी हातामध्ये वर्तमान पत्रांमधील बातम्यांच्या कात्रणाचे फलक घेऊन दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. यासोबतच वॉर्ड स्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून सुद्धा बदलण्यात आल्या. शहरातील भिंती रंगवण्यात आल्या. त्यावरही मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. हा पैसा गेला कुठे असा प्रश्न विरोधकांनी केला.
शहरातील कचरा, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात दहाव्या क्रमांकावरून १४ व्या क्रमांकावर पालिकेची घसरगुंडी झाली. या अपयशाला जबाबदार कोण याचा शोध घेण्याची मागणी विरोधकांनी केली. यासोबतच दोषी अधिकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेची घसरण झाली असून एवढा खर्च करून ही स्थिती का ओढवली याचा विचार व्हावा तसेच दोषी अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी अशी मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी मुख्य सभेत आंदोलन केले.