पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची स्वच्छता चक्क नलिकांमध्ये ‘पाणबुडे’ उतरवून करण्यात आली. पुण्यात हा प्रयोग अनेक वर्षांनी करण्यात आला असून, या नलिकांची आतून स्वच्छता करून घेण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाने दिली. पर्वती ते स्वारगेट येथील व्होल्गा चौकापर्यंतच्या मुख्य पाइपलाइनमध्ये सात पाणबुडे उतरविण्यात आले होते. नलिकेच्या आतील पाईप जॉइंडरचे लिकेजदेखील करण्यात आले.
दर आठवड्याला देखभाल दुरुस्तीसाठी ‘क्लोजर’ घेण्यात येते. गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मध्यवर्ती भागातील मुख्य वाहिनीतून शहराच्या मध्यवर्ती पेठांना पाणीपुरवठा होतो. ही वाहिनी ४० वर्षे जुनी आहे. ठिकठिकाणी त्याला गळती लागली असून मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा त्यामुळे विस्कळीत झाला होता. वाहिनीच्या बाहेरील बाजूने निदर्शनास येणारी आठ ठिकाणची गळती यापूर्वी थंबविण्यात आली आहे. आतील बाजूने असलेली गळती गुरुवारी बंद करण्यात आली.
ही वाहिनी रिकामी करून ऑक्सिजन मास्क घातलेले सात पाणबुडे नलिकेमध्ये उतरले. विशिष्ट प्रकारचे सिमेंट वापरून या पाइपचे जॉइंट भरून घेण्यात आले. यासाठी ९० किलो सिमेंटचा वापर करण्यात आला. हे सिमेंट किमान सहा वर्षे टिकते.
चौकट
पाणी मीटर रीडिंग मोबाईलवर पाठविण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. शहरात यापूर्वी बसविलेल्या पाणी मीटरचे रीडिंग घेणे शक्य नसल्याने प्रशासनाने मीटरधारकांनी मीटरचे रीडिंगचे फोटो आपल्या भागातील पालिकेच्या पाणी मीटर रीडरला पाठवावेत.