शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सफाई कर्मचारी महिलेने परत केली दीड किलो चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 8:06 PM

कचरा समजून त्यांनी ही पिशवी उचलून त्यांच्याजवळील प्लास्टीकच्या बकेटमध्ये टाकली...

ठळक मुद्देझाडण कामावेळी सापडली पिशवी : बिबवेवाडी पोलीस ठाण्यात जमा केला ऐवज

पुणे : कष्टकऱ्यांच्या प्रामाणिकपणाच्या कथा नेहमीच ऐकिवात येत असतात. अशीच एक घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास बिबवेवाडीमध्ये घडली. रस्ता झाडणाऱ्या महिलेने तब्बल दीड किलो चांदीचे दागिने असलेली रस्त्यावर सापडलेली पिशवी पोलीस ठाण्यात जमा केली. या महिलेच्या प्रामाणिकपणबद्दल पोलिसांनी तिचा सत्कार केला. पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी कस्तुराबाई गोरख हनवते (वय ५०, रा. पर्वती दर्शन) या बिबवेवाडीमध्ये नेमणुकीस आहेत. नेहमीप्रमाणे त्या नेमून दिलेल्या परिसरामध्ये झाडण काम करीत होत्या. कोठारी ब्लॉक येथे रस्त्यावर स्वच्छता करीत असताना त्यांना एक प्लास्टिकची पिशवी रस्त्यावर पडलेली आढळली. कचरा समजून त्यांनी ही पिशवी उचलून त्यांच्याजवळील प्लास्टीकच्या बकेटमध्ये टाकली. त्यावेळी धातूचा पडल्यासारखा आवाज आल्याने त्यांनी ही पिशवी उघडून पाहिल्यावर त्या चकीत झाल्या. या पिशवीमध्ये चांदीची आभुषणे होती. त्यांनी तातडीने सफाई निरीक्षक सचिन पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. पवार यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक नगरसेविका मानसी देशपांडे यांच्यासह पवार, कस्तुराबाई चांदीची आभुषणे असलेली पिशवी घेऊन पोलीस ठाणे गाठले. ही पिशवी व दागिने पोलिसांच्या हवाली केली. या पिशवीमध्ये दीड किलोचे गणपतीचा साज असलेले दागिने मिळून आल्याचे वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले. कस्तुराबाई यांनी कोणताही मोह न ठेवता लाखभर रुपयांचे चांदीचे सापडलेले दागिने प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपुर्द केले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नगरसेविका मानसी देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते रामविलास माहेश्वरी, वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच सफाई निरीक्षक सचिन पवार त्यांचे सहकारी डिंबळे, शब्बीर शेख, विनोद साबळे, श्रीधर कांबळे आणि महेश हरनावळ यांचेही अभिनंदन यावेळी केले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसWomenमहिला