सदर कार्यालयाकडे गेले दोन महिने शिलेदार प्रतिष्ठान व भोर तालुक दुर्गसंवर्धन समितीचे अध्यक्ष राजेश महांगरे यांनी वारंवार विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. तहसील कार्यालयाखाली असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ असलेल्या समाधीजवळ रद्दीचे ढीग, कपड्यांची गाठोडी, चपला असे समान तिथे ठेवले आहे. संस्थांनचा कारभार व्यवस्थित व्हावा म्हणून अनेक इमारती पंतसचिवांनी आपापल्या कारकिर्दीत बांधल्या; पण ज्या इमारतीतून आपल्या चरितार्थ चालतो त्या इमारतीचे अधिपतींच्या समाधीची जर ही आवस्था असेल तर, सामान्य जनतेचा काय? या गोष्टी निदर्शनात आणून देखील प्रशासन काहीच कृती करीत नसल्याची बातमी लोकमतने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत तहसीलदार अजित पाटील यांनी संबंधित विभागाला सूचना देऊन साफसफाई करून घेतली.
पंतसचिवांच्या समाधीची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:08 AM