पिंपरी : महापालिकेची स्वच्छतेत पिछाडी झाल्याबद्दल महापालिका आयुक्तांना विरोधी पक्षाच्या वतीने कचऱ्याचा बुके देण्यात आला. अभिनव पद्धतीने ‘स्वच्छमध्ये झालेल्या पिछाडीचा निषेध केला.पिंपरी-चिंचवड स्वच्छतेबाबत बेस्ट सिटी पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात मिळाला होता. मात्र, भाजपाची दोनवर्षांपूर्वी सत्ता आली अन जे शहर महाराष्ट्रात नंबर वन व देशात नवव्या क्रमांकावर होते. सन २०१७ मध्ये ७२ व्या स्थानी गेले तर सन २०१८ मध्ये शहर स्वच्छतेबाबत ४३ नंबरवर गेले. आता त्यानंतर यावर्षी ५२ व्या क्रमांकावर गेले. त्याबाबत आयुक्तांना कचऱ्यांचा गुच्छ भेट दिला. या वेळी विरोधीपक्षनेते दत्ता साने, नगरसेवक राजू बनसोडे, विनया तापकीर, माजी विरोधीपक्षनेते मच्छिंद्र तापकीर, विनोद नढे उपस्थित होते.याबाबत विरोधीपक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिराती सुरू आहेत. परंतु प्रत्यक्षात भाजपाचा आणि आपला कारभार नियोजन शून्य आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांचे फक्त मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळे अद्याप कचºयाची समस्या गंभीर झालेली आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांनी कचरासुद्धा सोडला नाही. त्यामुळे त्यांनी शहराचा कचरा करून टाकला आहे. बेस्ट सिटीची भाजपाने कचरा सिटी करून टाकली आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे शहरात सर्वत्र कचºयांचे ढीग साठले आहेत. कचरा विलिनीकरणाचा बोजवारा उडाला आहे.स्वच्छ शहर सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या कार्यकालामध्ये पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छतेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर होते तर देशात ९ व्या क्रमांकावर होते. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहरातील एक रेल्वे स्टेशन, एक बसस्टॉप एक चौक व एक रस्ता व एक झोपडपट्टीची पाहणी करून गुण दिले जातात. शहरातील चिखली परिसर, चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी, विद्यानगर झोपडपट्टी, रामनगर, गांधीनगर परिसरात जाऊन तेथील सार्वजनिक शौचालय, मुताºया, रस्ता, कचरा इत्यादींबाबत पाहणी करण्याबाबत सुचविले होते. या भागाची पाहणी जर सदस्यांनी केली नाही. त्यामुळे शहर पिछाडीवर आहे.’’
स्वच्छतेत पिछाडी; आयुक्तांना कचऱ्याचा बुके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 3:20 AM