वेल्हा व मुळशी तालुका १00 टक्के निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला असून, २६ जानेवारीपर्यंत ही मोहीम फत्ते करण्याचे आश्वासन दिले आहे. वेल्हे येथे झालेल्या कार्यशाळेत तर पिरंगुट येथे 'पंचायत समिती आपल्या दारी ' या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी वरील आश्वासन दिले आहे.मार्गासनी : जिल्ह्यात वेल्हे तालुका हा सर्वांत अगोदर निर्मलग्राम होणार असून, २६ जानेवारीपर्यंत तालुका निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, वेल्ह्याच्या सभापती सविता वाडघरे यांनी कार्यशाळा घेऊन हा विश्वास व्यक्त केला. २६ जानेवारीला निर्मलग्राम करूनच राष्ट्रध्वज फडकवला जाणार असल्याची माहिती सभापती सविता वाडघरे यांनी या वेळी दिली.यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.या कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार देशमुख, जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे, सुषमा रेणुसे, माजी सभापती चतुरा नगिने, उपसभापती चंद्रकांत शेंडकर, कुस्तागीर संघाचे अध्यक्ष शंकर भुरुक , राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक अध्यक्ष किरण राऊत, विद्यार्थी सेनेचे प्रमोद लोहकरे, राष्ट्रवादीचे तानाजी मांगडे, वेल्ह्याचे सरपंच संतोष मोरे, राजगड कारखान्याच्या संचालिका शोभाताई जाधव, शिवसेना तालुकााध्यक्ष सुनील जागडे, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी, सहायक गटविकास अधिकारी सतीश गाढवे आदींसह सरपंच, अंगणवाडीताई, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुरवसे यांनी केले. गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी आभार केले. (वार्ताहर)
स्वच्छतेची ‘झाडाझडती’
By admin | Published: December 01, 2014 3:45 AM