लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, आज रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड नाहीत़ कोरोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय उरणार नाही़ त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे व त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे रात्री आठपूर्वीच आप-आपली दुकाने बंद करावी व घरी जावे़, असे आवाहन पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केले आहे़
रांका म्हणाले की, शहरात गेल्या काही दिवसांपासून सोडतीन हजाराच्या आसपास कोरोनारुग्णांची वाढ सातत्याने होत असून, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढीच्या ५० टक्के आहे़ आजमितीला शहरात मृत्यूची संख्याही वाढत असून, रूग्णालयात बेड शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे़ सरकारने अनेकवेळा सूचना करून, महासंघाने वारंवार आवाहन करूनही नागरिकांनी कोरोनाला गांभिर्याने घेतले नाही़ सध्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहणारया नागरिकांमध्ये कोरोनावाढीचे प्रमाण मोठे असून, कोरोना आपल्याला काही करू शकत नाही ही चुकीची कल्पना आपण बाळगत आहोत़
शनिवारी मध्यरात्रीपासून शहरात रात्री आठ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी पुकारण्यात आली असून, दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ मात्र आपण त्याचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे़ पण हे आदेश पाळले नाहीत तर, दंडात्मक कारवाईसह दुकानांना सीलही लावण्यात येणार आहे़ त्यामुळे आपणास विनंती की, संध्याकाळी सातपर्यंत किंबहुना जास्तीत जास्त साडेसात वाजेपर्यंत आपआपले व्यवहार पूर्ण करून दुकाने बंद करावी़ आठ वाजल्यानंतर कुठल्याही कारणास्तव दुकाने उघडी ठेऊ नका़ आपल्याकडे कर्मचारी वर्गही असून, दुकाने बंद केल्यावर त्यांनाही घरी जाण्यास वेळ लागतो़ रात्री आठनंतर रिक्षा, बस बंद असल्याने कर्मचाºयांना साडेसात वाजता किंवा सात वाजताच घरी सोडावे तसेच दुकानदारांनीही आठपूर्वीच घरी जावे़
कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर सहकार्य करणे आपल्याला आवश्यक असून, नागरिकांनीही यास सहकार्य करावे़ मास्क चा वापर करावा व सोशल डिस्टसिंग ठेवावे़ सरकार सरकारची जबाबदारी पार पाडत असून, वारंवार कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियम पाळण्याबाबत सर्व माध्यमांमाव्दारे आवाहन करीत आहे़ पण दुर्देवाने आपण सुज्ञ नागरिक या सर्व सूचनांचे उल्लंघन करीत आहोत़ व याचा त्रास नियम पाळणाºया व्यक्तींना होत आहे़ त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन आणायचा नसेल तर आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे़ व्यापाºयांनी पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावा अशी विनंतीही यावेळी रांका यांनी पुणे व्यापारी महासंघाच्यावतीने केली़
-----------------------