शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:13 AM

अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही.

बिबवेवाडी  - अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही.बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अप्पर येथील डॉल्फिन चौक, महेश सोसायटी चौक सकाळी नऊच्या सुमारास आंदोलकांनी बंद केला. त्यामुळे भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. पुरुष तसेच युवकांसोबत महिला व मुलीदेखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. एक-दोन बसवर काही आंदोलकांनी दगड मारले. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सर्व बस अप्परकडे येण्यासाठी बंदी केली. काही बसला बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या मागे लावण्यात आले. तर काही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्या. अनेक वेळा आंदोलक आक्रमक झाले. मात्र पोलिसांनी अतिशय जबाबदारीचे भान राखत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा देत कोरेगाव भीमाला घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच प्रत्येक चौकात भाजपाच्या विविध नेत्यांचे रस्त्यावर लागलेले फलक काढून जाळण्यात आले. दुपारी तीनपर्यंत अनेक चौक अडवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. भागातील सर्व दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आलेहोते. काही शाळा, दवाखाने, बँका मात्र सुरू होत्या.वडगाव, धायरीमध्ये बंदला संमिश्र प्रतिसादवडगाव बु. : येथे कडकडीत तर धायरीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणाम धायरी परिसरातील दैनंदिन जीवनातील व्यवहारात दिसून आला. दिवसभर मेडिकल, बँका (अत्यावश्यक सेवा) वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. परिसरात शांततेत हा बंद पार पडला. परिसरातील काही शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली तर काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या नगण्य होती. सर्व प्रमुख रस्त्यावर वर्दळ खूप कमी होती, पीएमपीदेखील क्वचित दिसत होत्या. वडगाव बु. व धायरीतील प्रमुख चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दलित तरुणांनी दुचाकी व पायी मोर्चे काढून कोरेगाव भीमातील घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद