बारामती: विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती निवासस्थानासमोर घोषणाबाजी आणि एक कापडी पुतळा जाळल्याप्रकरणी भाजपच्या २८ कार्यकर्त्यांना बारामती शार पोलिसांनी अटक केली आहे. तसेच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी वक्तव्यावरून त्यांच्या खाजगी निवासस्थानी सहयोग सोसायटीच्या प्रवेशद्वारावर घोषणा देत भारतीय जनात पार्टीचे झेंडे व अजित पवार यांच्या विरोधात निषेधाचे फलक घेऊन एक कापड़ी पुतळा जाळला. सदर आंदोलनकर्ते यांनी या आंदोलनाबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. उलट पक्षी पोलिसांनी बारामती येथील भाजप कार्यालया जवळून भिगवण चौकात मोर्चा निघणार असणारी तिकडे बंदोबस्त दिलेला या प्रकारे अचानक बाहेरून आलेल्या लोकांनी सहयोग सोसायटी समोर जमून आंदोलन सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
काही क्षणातच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व स्टाफ त्या ठिकाणी पोहोचले. कोणाच्याही खाजगी निवासस्थानी कुणालाही आंदोलन करता येत नाही म्हणुन अंदोलनकर्ते यांना ११.४० वा सुमारास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणले त्यांचे कडील बोर्ड व झेंडे जप्त केले. पुढील तपास एपीआय वाघमारे करत आहेत.