शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुख्यमंत्र्यांना गिरीश बापट मंत्रिमंडळात नको : काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 8:07 PM

शहरातील भाजपाच्या सर्व आमदारांसह शहराध्यक्षही भाजपाचे उमेदवार गिरीष बापट यांच्या विरोधात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रीमंडळामध्ये बापट नको होते. त्यांना राजकारणातून निवृत्त करायचे होते. त्यामुळेच त्यांना पुण्याची उमेदवारी दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला आहे

पुणे : शहरातील भाजपाच्या सर्व आमदारांसह शहराध्यक्षही भाजपाचे उमेदवार गिरीष बापट यांच्या विरोधात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रीमंडळामध्ये बापट नको होते. त्यांना राजकारणातून निवृत्त करायचे होते. त्यामुळेच त्यांना पुण्याची उमेदवारी दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला आहे. तसेच शहराचे खासदार अकार्यक्षम असल्यानेच त्यांना बदलण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले. 

जोशी यांनी गुरूवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संवाद साधला. माजी उपमहापौर डॉ. सतिश देसाई व माजी नगरसेवक वीरेंद्र किराड उपस्थित होते. पुढे जोशी म्हणाले की, बापट यांच्या विरोधात शहरातील सर्व आमदार, शहराध्यक्ष असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढायचे होते. यामध्ये फडणवीस यांचा मोठा हात आहे.  

पुण्यासाठी भरपूर पाणी असताना नियोजन नसल्याने शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई आहे. नागपुरमध्ये मेट्रो धावु लागली तरी पुण्यात फक्त खांबच दिसत आहेत. पेन्शनरांचे शहर, सायकलींचे शहर असलेल्या पुण्याची ओळख काँग्रेसने आणलेल्या प्रकल्पांमुळे बदलली आहे. पेन्शनरांचे शहर ते आयटी हब, स्पोर्टस् हब, आॅटोमोबाईल हब ही नवी ओळख पुण्याला मिळाली आहे. मात्र, मागील पाच वर्षांत विकासाला खीळ बसली आहे. विकास हाच मुख्य मुद्दा प्रचारात ठेवून त्यादृष्टीने जाहीरनामा लवकरच प्रसिध्द करू, असे जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणेgirish bapatगिरीष बापटDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस