शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी, निधनाची बातमी ऐकून मन सुन्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 12:22 PM

लक्ष्मण जगताप भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते...

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते. मतदारांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली. 

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या जाण्याने पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. ते आजारी असतानादेखील विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी व्हिलचेअरवर आले होते. अशा निष्ठावंत आमदाराचे दुखःद निधन झाले आहे. एक आदर्श असा लोकप्रतिनिधी हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली-

टॅग्स :PuneपुणेLakshman Jagtapलक्ष्मण जगतापEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री