नीरा नृसिंहपूर: पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कोणताही व्यवसाय करण्याचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे या सर्वांच्या प्रयत्नाने योजनेअंतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी व्यवसायाचे माहिती पत्रक देऊन अर्जाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे पुतणे प्रितेश भरणे, सचिन खामगर, सुहास कारंडे, विकी कांबळे, सागर पवार, माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके, विस्तार अधिकारी इनुस शेख, नृसिंहपूरचे उपसरपंच विठ्ठल देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत, आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते, प्रशांत गायकवाड, बबनदादा बोडके, चांगदेव बोडके, नामदेव बोडके, बाळासाहेब घाडगे, संतोष सुतार, शहाजीअण्णा बोडके, सुदर्शन बोडके, रमेश मगर, प्रवीण बोडके, बाप्पा मगर, आशोक बोडके, गोविंद सुळ, नाथा रुपनवर, वर्धमान बोडके, राजेंद्र लावंड, शशिकांत सूर्यवंशी, जगु मोहिते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत बोडके यांनी केले, तर सूत्रसंचालन महेश सुतार व शेवटी आभार प्रदर्शन आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी मानले.
पिंपरी बुद्रुक येथे कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले.
०३०४२०२१-बारामती-०२