शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

उद्धव ठाकरे नुसते बोलू नका, काहीतरी कारवाई करा- किरीट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 12:19 PM

बोलणे बंद करावे व कारवाई करायला सुरुवात करावी....

पुणे : राज्य सरकारमधील एकेक मंत्री घोटाळ्यात सापडत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त बोलत आहेत, त्यांनी आता बोलणे बंद करावे व कारवाई करायला सुरुवात करावी, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

सॅलीसबरी पार्कजवळच्या आयकर सदनमध्ये शुक्रवारी दुपारी खासदार सोमय्या आले होते. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आयकर विभागाकडे केलेल्या तक्रारीचे काय झाले, याची विचारणा करण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सोमय्या यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. सोमय्या म्हणाले, मुश्रीफ यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमा केली. त्याबाबत मी तक्रार केली आहे. खासदार संजय राऊत यांनी नुकतेच सक्तवसुली संचालनालयात ५५ लाख रुपये जमा केले. जनतेचा पैसा जनतेच्या तिजोरीत गेला. घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या सर्वांनाच हे करावे लागणार आहे.

जरंडेश्वर कारखान्याबाबत न्यायालयाने आता निकाल दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कारखान्यांच्या सभासदांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. कारवाई झाली तर कारखाना बंद पडणार नाही, तो सुरूच राहणार आहे. हा कारखाना पवार यांचा कधी नव्हताच. तो त्यांनी गैरपणे विकत घेतला. गुरू कमोडिटी ही कंपनी त्यांच्याच माणसांची आहे. याही तक्रारीचा आम्ही कायम पाठपुरावा करणार आहोत.

अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ, संजय राऊतअजित पवार ही सगळीच नावे घोटाळ्यातील नावे आहेत. घोटाळे सिद्ध होत आहेत व तरीही मुख्यमंत्री म्हणून ठाकरे काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यांनी आता बोलणे बंद करून कारवाई करायला हवी, असे सोमय्या म्हणाले.

सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना लगेचच तिथून काढून लावले. सोमय्या म्हणाले की, पोलिसांनी पवार यांच्या माणसांना मला भेटू द्यायला हवे होते. घोटाळा कसा झाला, हे मी त्यांना सांगितले असते.

शिवसेनेने मागील वेळी सोमय्या यांनी महापालिकेच्या आवारात धक्काबुक्की केली होती. ते लक्षात ठेवून भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी सोमय्या यांच्याभोवती कडे केले होते. माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, संदीप खर्डेकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारHasan Mushrifहसन मुश्रीफAnil Parabअनिल परबAnil Deshmukhअनिल देशमुखCrime Newsगुन्हेगारी