शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

सीएमए, पीवायसी विजयी

By admin | Published: May 12, 2017 5:08 AM

पीवायसी, पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सीएमए आणि एच. के. बाऊन्स संघाने व्हेरॉक चषक १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी विजय मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पीवायसी, पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सीएमए आणि एच. के. बाऊन्स संघाने व्हेरॉक चषक १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी विजय मिळविले. पुष्पच्या सम्यक शहाचे धडाकेबाज नाबाद शतक दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगरसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या वतीने थेरगाव येथील मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. सामनावीर सम्यक शहाच्या ६० चेंडूतील नाबाद १४६ धावांमुळे प्रथम फलंदाजी करताना पुष्प अ‍ॅकॅडमीने २५ षटकांत ९ बाद २६४ अशी भक्कम धावसंख्या उभारली. सम्यकला तनिश गांधीने ७१ धावा करीत चांगली साथ दिली. देवधर ट्रस्टला हे मोठे आव्हान पेलवता आले नाही. त्यांचा डावा २२.५ षटकांत १२४ धावांत आटोपल्याने त्यांना १४० धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांच्या वरद रावने सर्वाधिक ३८ धावा केल्या. पुष्पकडून हरजस कोहली (४/१६) आणि समिर ताहा ( ३/१६) यांनी देवधर ट्रस्टला गुंडाळले.एच. के. बाऊन्सने पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेवर (पीडीसीए) सहा गडी राखून विजय मिळविला. पीडीसीएने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४० धावा केल्या. त्यांच्या प्रतीक शेलार (५५) आणि वरुण चौधरी (३०) यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. एच. के. कडून अवनीश गायकवाड आणि दिग्विजय पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. एच. के. बाऊन्सने २३.१ षटकात ४ बाद १४१ धावा करीत विजय मिळविला. त्यांच्या आर्शिन कुलकर्णी (नाबाद ४४), दिग्विजय पाटील ( ३८) आणि वेदांत जगदाळे (३१) विजयी लक्ष्य गाठण्यात महत्त्वाचे योगदान दिले. एचकेचा अष्टपैैलू दिग्विजय पाटील सामनावीर ठरला.सीएमए संघाने पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी (सोलापूर) संघावर २३ धावांनी मात केली. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४३ धावा केल्या. त्यांच्या साहिल अभंगने नाबाद ४३ आणि गौरव गोगावलेने २३ धावा केल्या. पुष्प अ‍ॅकॅडमीला २३.१ षटकात १२१ धावापर्यंतच मजल मारता आली. त्यांच्या सम्यक शहाने ३५, संंकेत काखांडीने २२ आणि तनिश गांधीने २१ धावा केल्या. सीएमएकडून सामनावीर विक्रांत कुलकर्णीने २८ धावांत चार, ऋग्वेद वडनेरकरने ८ धावांत तीन आणि गौरव गोगावलेने ११ धावांत दोन बळी घेतले. पीवायसी : २५ षटकात ६ बाद १५५ ( अनिष जगताप ६३, मिहिर देशमुख ४४, साईराज चोपडे १६, सुचेत रात्रा ३//३८, कमल शर्मा २/३३) वि.वि. प्राधिकरण जिमखाना : १४.१ षटकात २४ ( आर्यन परदेशी ९, साईराज चोरगे ३/८).पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी : ९ बाद २६४ ( सम्यक शहा १४६, तनिश गांधी ७१, अमोघ कुलकर्णी २/४०,वरद राव २/५७.) वि.वि. देवधर ट्रस्ट : १२४ ( वरद राव ३८, हरजस कोहली ४/१६, समिर ताहा ३/१६) पीडीसीए : ८ बाद १४० ( प्रतिक शेलार ५५, वरुण चौधरी ३०, दिग्विजय पाटील ३/१८) पराभूत वि. एच.के. बाऊन्स : २३.१ षटकात ४ बाद १४१ ( आर्शिन कुलकर्णी नाबाद ४४, दिग्विजय पाटील ३८) सीएमए : ५ बाद १४३ (साहिल अभंग नाबाद ४३, समिर ताहा २/२५, वि.वि. पुष्प क्रिकेट अ‍ॅकॅडमी : १२१ (संकेत काखांडी २२, तनिश गांधी २१, विक्रांत कुलकर्णी ४/२८,ऋग्वेद वडनेरकर ३/८)