हडपसर : पीएमपीला भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या बसपैकी एका बसला शनिवारी सकाळी आग लागली. त्या आगीमध्ये ही बस जळून खाक झाले. ही बस सीएनजी गॅसवर होती. या बसच्या शेजारी ५० बस उभ्या होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेवर येऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण समजू शकले नाही. पीएमपीला महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या काही बसेस भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. नितीन सातव हे या ट्रान्सपोर्टचे मालक आहेत. या बस येथील डीपी रोडवरील साडेसतरानळी येथील जागेत उभ्या असतात. आज सकाळी ८.१५ वा उभ्या असलेल्या बसपैकी एका बसला आग लागली. लगेचच पाच मिनिटांत अग्निशामकचे जवान पोहोचले. हडपसर अग्निशामक केंद्राचे अधिकारी चव्हाण, ड्रायव्हर चंद्रकांत जगताप, फायरमन सखाराम पवार, दत्तात्रय चौधरी व बाबासाहेब चव्हाण यांनी घटनास्थळी पोहोचून अवघ्या पाच मिनिटांमध्ये आगीवर ताबा मिळवत आग पूर्णपणे विझवली.
सीएनजीवर चालणाऱ्या पीएमपीला अचानक आग; अग्निशामकने आग आणली आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:33 AM
पीएमपीला भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या बसपैकी एका बसला शनिवारी सकाळी आग लागली. त्या आगीमध्ये ही बस जळून खाक झाले. ही बस सीएनजी गॅसवर होती.
ठळक मुद्देया बसच्या शेजारी उभ्या होत्या ५० बस अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेवर येऊन आग आणली आटोक्यात