पुणे : दररोज पुणे ते मुंबई दरम्यान हजारो लोक प्रवास करतात. अनेक जण सुरक्षित व स्वस्त पर्याय म्हणून रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे या मार्गावर कमी वेळेत अधिक प्रवाशांना ये-जा करता यावी यासाठी डेक्कन क्वीन एक्सप्रेस डबल टेकर मध्ये रुपांतरीत करावी, अशी माघणी विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निखील काची यांनी केली आहे.
समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काची याकडे लक्ष वेधले. अद्ययावत तंत्रज्ञानानुसार डबल डेकर रेल्वे ताशी १६० कमिी वेगापर्यंत धावु शकते. याचा फायदा अनेक प्रवाशांना होणार आहे. त्याचप्रमाणे पुणे हे अनेक महत्वाच्या शहर व राज्यांना जोडणारे स्थानक आहे. पण स्थानकातील लोडिंग व अनलोडिंग फुरसुंगी व सासवड येथे हलविले आहे. यामुळे सुमारे २ हजार माथाडी कामगार बेरोजगार झाले आहेत. वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे मालधक्का चौक येथे लोडिंग व अनलोडिंग पुन्हा सुरू करण्याची मागणीही काची यांनी केली.