पुणे : जिल्ह्यात २२१ किलोमीटर लांबीच्या २२ महामार्ग प्रकल्पांचा नारळ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २४) फोडला जात आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहे.
गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता कात्रज येथे महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे.
-------
जिल्ह्यातील केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) अंतर्गत रस्त्यांची कामे
-राज्य महामार्ग १०६ महाड मेढेघाट वेल्हे नसरापूर ते चेलाडी फाटा १६ किमी, किंमत ४.८१ कोटी रुपये
-राज्य महामार्ग १०३ उरण पनवेल भीमाशंकर वाडा-खेड-पावळ-शिरूर १० किमी, किंमत ३.९१ कोटी रुपये
-राज्य महामार्ग १२६ मुंबई-पुणे रस्ता (वडगाव येथील अंतर्गत रस्ता लांबी) ता. मावळ १.९० किमी, ३.९९ कोटी रुपये
-राज्य महामार्ग १३४ दौंड (जि. पुणे) ते गार (जि. नगर) भीमा नदीवरील पूल १६० मी, २० कोटी रुपये
-जिल्हा मार्ग ६२ चांबळी कोडीत नारायणपूर बहिरवाडी काळदरी रस्ता १२ किमी, ४.९१ कोटी रुपये
-जिल्हा मार्ग घोडेगाव नारोडी-वडगाव काशिंमबेग साकोरे कळंब रस्त्यावरील मोठा पूल ता. आंबेगाव १४० मीटर, ७.२२ कोटी
-जिल्हा मार्ग ६५ बारामती-जळोची- कन्हेरी लकडी-कळस लोणी देवकर रस्ता १५ किमी, ४.९१ कोटी
-जिल्हा मार्ग ११४ कारेगाव करडे निमोणे रस्ता ५.६० किमी, ३.९३ कोटी रुपये
-जिल्हा मार्ग १४९ ओतूर ब्राह्मणवाडा रस्ता १०.५० किमी, ३.९० कोटी रुपये
-जिल्हा मार्ग ५६ हडपसर मांजरी वाघोली कॉक्रीट रस्ता ३.५० किमी, ३.८५ कोटी रुपये
-जिल्हा मार्ग ३४ केशवनगर लोणकर पाडळ मुंढवा रस्ता २.५० किमी, २.२० कोटी रुपये
-जिल्हा मार्ग ६१ सासवड राजुरी सुपा रस्ता, ६ किमी, ४.९१ कोटी रुपये
-जिल्हा मार्ग १६९ वरकुटे (खु.) वडपुरी गलोटे वाडी नं. २ सरदेवाडी ते रा.म. ६५ रस्ता ६ किमी, ४.९१ कोटी रुपये
-जिल्हा मार्ग १२ वाडा (ता. खेड) घोडा (ता. आंबेगाव) रस्ता ९ किमी, २.७२ कोटी रुपये
-जिल्हा मार्ग ३१ डेहने नाईफड (ता. खेड) पोखरी (ता. आंबेगाव) रस्ता ५.५० किमी, १.९७ कोटी रुपये
-जिल्हा मार्ग ६६ रा.मा. १०३ ते खंडोबामाळ निमगाव रस्ता व ब) प्र.जि.मा. १९ निमगाव दावडी रस्ता १२.६० किमी, २४.२० कोटी रुपये
-निमगाव खंडोबा येथील हवाई रोपवेचे सर्व सोयींसह सुधारीकरण व इतर बांधकामासह रोपवे करणे ३१.८१ कोटी रुपये
एकूण : १४ रस्त्यांची कामे, २ पूल, १ रोपवे ११६.४० किमी, १३४.१८ कोटी रुपये
*****