पुणो : सुमारे दोन वर्षापासून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणो (सीओईपी) आणि संचेती रुग्णालयाजवळ उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यामुळे सीओईपीच्या विद्याथ्र्याना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. पुणो महानगरपालिकेने याबाबत लक्ष घालावे, असे दहावे स्मरणपत्र पालिका आयुक्तांना सीओईपीतर्फे पाठविण्यात आले आहे. परंतु, त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे एखाद्या विद्याथ्र्याचा जीव गेल्यानंतरच पालिकेचे डोळे उघडणार आहेत का, असा सवाल सीओईपीतर्फे विचारण्यात आला आहे.
सीओईपीचे दोन ते अडीच हजार विद्यार्थी दररोज वसतिगृहापासून कॉलेजर्पयत जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात. गेल्या काही महिन्यांमध्ये रस्ता ओलांडताना दुचाकीस्वारांनी विद्याथ्र्याना धडक दिल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने याबाबत लक्ष देऊन अपघात थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा पत्रव्यवहार सीओईपीतर्फे पालिकेकडे नऊ वेळा करण्यात आला, तरीही प्रश्नासनाकडून हालचाली केल्या जात नाहीत. आता सीओईपीने दहावे स्मरणपत्र पाठविले आहे.
शिवाजीनगरकडून जंगली महाराज रस्त्याकडे जाणारी वाहतूक, तसेच संचेती रुग्णालयाकडून मुंबई- पुणो रस्त्याकडे जाणारी वाहतूक आणि आरटीओ करून संचेती रुग्णालयाकडे येणा:या हजारो वाहनांमुळे विद्याथ्र्याना रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागतो. त्यात संचेती रुग्णालयाजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. तसेच, येथील
जुन्या उड्डाणपुलावरील पदपथही नाहीसे झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींना सामोरे जावे
लागत आहे.
सीओईपीच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ. महेश शिंदीकर म्हणाले, दोन ते अडीच हजार विद्याथ्र्याना दररोज वसतिगृह ते कॉलेज कॅम्पस या दरम्यान ये-जा करावी लागते. परिणामी सर्वच विद्याथ्र्याना रस्ता ओलांडत जीव मुठीत धरून चालावे लागते. वसतिगृहातून खेळाच्या मैदानार्पयत जातानासुद्धा मोकळा रस्ता मिळत नाही. वेगाने येणा:या वाहनांना चुकवूनच विद्यार्थी मैदानार्पयत आणि कॉलेज कॅम्पस र्पयत पोहोचतात.
(प्रतिनिधी)
सीओईपीने स्वत:च्या मालकीची काही जागा पालिका प्रशासनाला उड्डाणपूल बांधण्यासाठी दिली आहे. त्या बदल्यात पालिकेकडून विद्याथ्र्यासाठी जाण्या-येण्यासाठी ‘फ्लाय ओव्हर’ तयार करून दिला जाणार होता. परंतु, अद्याप त्यासंदर्भातील कोणत्याही हालचाली पालिकेने केल्या नाहीत. येथील दोन सिग्नलमधील अंतरसुद्धा 2क् ते 3क् सेकंदांचेच असते. त्यामुळे वेगाने येणा:या वाहनांना अटकाव घालण्यासाठी रस्त्यावर स्पीडब्रेकर घालणो आवश्यक आहे. या सर्व बाबींवर चर्चा करून, योग्य पाऊल उचलावे. असे स्मरणपत्र आम्ही पालिकेला दिले आहे.
- डॉ. महेश शिंदीकर,
विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी, सीओईपी.
4येथील जुन्या उड्डाणपुलावरील पदपथही नाहीसे झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींना सामोरे जावे
लागत आहे.
4वेगाने येणा:या वाहनांना चुकवूनच विद्यार्थी मैदानार्पयत आणि कॉलेज कॅम्पस र्पयत पोहोचतात.